सध्या बहुतेक जण स्मार्ट डिव्हाईस वापरत असताना इअरफोन (earphone wires) स्वतः जवळ ठेवताचचं. पण इअरफोन वापणाऱ्या सर्वांनाच एकसारख्याच समस्येला तोंड द्यावं लागतं. ऐनवेळी इअरफोनचा गुंता झाल्याने अनेकांना तो सोडवताना नाकी नऊ येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्यतः खिशात किंवा बॅगेत व्यवस्थितरित्या ठेवलेला इअरफोन (earphone) गरजेच्यावेळी आपल्याला गुंता झालेल्या अवस्थेतच सापडतो. यामुळे मात्र अनेकांची चिडचिड झाल्याचं पाहायला मिळतं. पण हा गुंता नेमका होतोच कसा?


आतापर्यंत तुम्हाला असे वाटत असेल की इअरफोन्स गुंता होणं ही तुमची चूक आहे पण तसे नाही. जेव्हा जेव्हा इअरफोनच्या तारांचा गुंता होता त्यामागे शास्त्र काम करते आणि हे शास्त्र 'नॉट थिअरी' (knot theory) म्हणून ओळखले जाते.


कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या दोन संशोधकांनी इअरफोन्सच्या वायर्समधील गुंत्याबद्दल एक मनोरंजक संशोधन केले आहे. 2012 मध्ये, दोन्ही संशोधकांनी या गुंत्यांच्या संदर्भातील सिद्धांताचा अभ्यास केला, ज्यामध्ये त्यांना आढळले की या वायर्सच्या अडकण्यामागे विज्ञान काम करते. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या लांबीच्या अनेक वायर्सचा एक प्रयोग केला तेव्हा त्यांना असे आढळून आले की, वायर्सचा गुंता व्हायला फक्त 10 सेकंद लागतात. या सिद्धांताला गाठ सिद्धांत म्हणूनही ओळखले जाते.


प्रयोग काय होता?


या सिद्धांताचा अभ्यास करण्यासाठी, संशोधकांनी वेगवेगळ्या लांबीच्या तारा घेतल्या आणि त्या बॉक्समध्ये ठेवून त्या फिरवायला सुरुवात केली. संशोधकांना असे आढळले की बॉक्स 5-10 वेळा फिरवल्यानंतर 10 सेकंदात इअरफोन्सचा गुंता होतो. तारांच्या अडकण्याच्या या प्रक्रियेत तारांची लांबी आणि जाडीमुळेही फरक पडतो. तार जितक्या लांब आणि मऊ असतील तितका त्याचा गुंता होण्याची  शक्यता जास्त असते.