... म्हणून `सोशल मीडिया`वर चिडून व्यक्त होतात लोक
सोशल मीडियावर चर्चा करण्या ऐवजी लोक आक्रमक रूपात व्यक्त होतात. तसेच, संवादाऐवजी वादच अधिक घालतात. लोकांच्या या व्यक्त होण्याचे कारणही एका सर्वेनुसार पुढे आले आहे.
मुंबई : 'सोशल मीडिया' हा संवादाचे खुले व्यासपीठ. यावर अधिक व्यापक चर्चा व्हावी ही सर्वसाधारण अपेक्षा. पण, होते भलतेच, एका सर्वेनुसार असे दिसते की, सोशल मीडियावर चर्चा करण्या ऐवजी लोक आक्रमक रूपात व्यक्त होतात. तसेच, संवादाऐवजी वादच अधिक घालतात. लोकांच्या या व्यक्त होण्याचे कारणही एका सर्वेनुसार पुढे आले आहे.
लोक संवाद कमी आणि बोलणे अधिक करतात
सायकॉलॉजिकल सायन्स जर्नलमध्ये छापून आलेल्या एका रिसर्च पेपरमध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी पुढे आलेल्या आहेत. सर्व्हेच्या आधारे छापलेल्या या पेपरमध्ये लोक एखाद्या मुद्यावर आपले मत लिखित स्वरूपात व्यक्त करतील तर, त्या विषयावर संवाद करण्याऐवजी लोक बोलू लागतात. (इथे संवाद करणे आणि बोलणे यातला फरक सुज्ञ वाचकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.) जर कोणी राजकीय मुद्द्यांवर तोंडी चर्चा करत असेल तर, लोक त्याचे म्हणने पटकण लक्षात घेतात. पण, जेव्हा हेच म्हणने जेव्हा लिखीत स्वरूपात व्यक्त केले जाते तेव्हा मात्र असे होत नाही, असे या पेपरमध्ये म्हटले आहे.
सोशल मीडियावरील चर्चेचा परिणाम धक्कादायक
सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्ट आणि त्यावर झालेल्या चर्चा यांचा परिणाम धक्कादायक असतो. वेगवेगळ्या घटकांमध्ये तो वेगवेगळा दिसू शकतो. दिसतो. रिसर्च पेपर लिहिणाऱ्या संशधकाने सोशल मीडियावरील सुमारे 300 लोकांना वादविवाद पहायला लावले. ज्यात युद्ध, अबॉर्शन, वेगवेगळ्या प्रकारचे संगित यांबाबत मतमतांतरांचा समावेश होता. त्यानंतर या लोकांना कोणता वाद किंवा आर्ग्युमेंट चांगल्या पद्धतीने समजला असे विचारण्यात आले.
व्यक्तिचा आवाज त्याच्यातील मानवता आणि जबाबदारी दर्शवतो
संशोधकांनी सांगितले की, जे लोक सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या मतांवर असमहमत होते त्यांचा वादसंवाद करणाऱ्याबद्दलाच दृष्टीकोन अत्यंत आक्रमक आणि अमानवी होता. या मंडळींनी खूप कमी वेळा पोस्ट लिहिणाऱ्या किंवा मत मांडणाऱ्या लोकांना ऐकले आणि त्यांचे मत समजून घेण्याचा प्रयत्न केला. बर्कले येथील संशोधक ज्युलियाना सांगते की, व्यक्तीचा आवाज ही त्याची मानवता आणि जबाबदारी दाखवतो. म्हणूनच त्यावर अधिक काम होणे गरजेचे आहे.
वाचलेले आणि ऐकलेले यात मोठे अंतर..
ज्युलियानाने सांगितलेली आणि सर्वेमध्ये पुढे आलेली धक्कादायक बाब अशी की, एक व्यक्ती एका राजकीय व्यक्तिच्या विचारांबाबत अतिशय असहमत होती. या व्यक्तीने त्या राजकीय नेत्याचे भाषण वृत्तपत्रात ऐकले होते. दरम्यान, पुढच्या आठवड्यात याच व्यक्तिला त्याच नेत्याचे तेच भाषण रेडिओवर ऐकवले. आश्चर्यकारक असे की, त्या व्यक्तिचच्या भाषण वाचलेल्या आणि भाषण ऐकलेल्या दोन्ही प्रतिक्रियांमध्ये मोठे अंतर होते. किंबहून दोन्ही प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या.
सोशल मीडियावरून लोकांचे ध्रुविकरण
दरम्यान, ज्युलियाने असेही म्हटले आहे की, राजकीय व्यक्तिंच्या सोशल मीडियावर व्यक्त होण्यामुळे लोकांचे ध्रुविकरण होतेय. हे ध्रुविकरण अत्यंत अमानवी असून, भविष्यात लोकाच्या एकात्मतेला धोका पोहोचवू शकते.