मुंबई : सुरक्षा रक्षक अर्थात महत्वाच्या पदावर असलेल्या राजकीय नेत्यांचे अंगरक्षक सनग्लास का घालतात. हा प्रश्न अनेकांना पडतो, पंतप्रधानांच्या आजूबाजूला असलेले एसपीजीचे  लोक देखील, सनग्लास लावलेले दिसतात.


नजर नेमकी कुणावर आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंगरक्षक सनग्लास लावण्याची अनेक कारणं आहेत, त्यात महत्वाचं म्हणजे त्यांची नजर नेमकी कुठं आणि कुणावर आहे, हे सहज कळू नये, तसेच एखाद्या संशयितावर करडी नजर ठेवणं त्यांना सोप जात असतं. 


काळ्या चष्म्यातून पाहताना


एखाद्या व्यक्तीकडे पुन्हा पुन्हा पाहिल्यावर तो सावध होतो. मात्र काळ्या चष्म्यात संशयिताला कळतंच नाही, आपल्यावर नजर आहे. तसेच एसपीजी सारख्या सुरक्षा यंत्रणांसाठी ट्रेनिंग घेतलेले हे जवान, कुणाकडे पाहत आहेत, हे सहसा कळत नाही.


स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप


पंतप्रधान, राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधानांच्या घरातील महत्वाच्या व्यक्तींना एसपीजी सुरक्षा दिली जाते. एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप.


उन्हात दूरपर्यंत नजर


अनेक वेळा सार्वजनिक कार्यक्रम, सभा या ठिकाणी उन्हात दूरपर्यंत नजर ठेवण्यात सोपं जावं, म्हणून हे अंगरक्षक सनग्लास वापरतात.