फेसबुक का मागतोय अशा व्यक्तीकडून नग्न फोटो?
ब्रिटनमध्ये ज्या व्यक्तीचा `न्यूड` फोटो कुणीतरी फेसबुकवर अपलोड केला आहे, असा फोटो स्वत: फेसबुककडे देण्याचं आवाहन फेसबुकने केले आहे
लंडन : ब्रिटनमध्ये ज्या व्यक्तीचा 'न्यूड' फोटो कुणीतरी फेसबुकवर अपलोड केला आहे, असा फोटो स्वत: फेसबुककडे देण्याचं आवाहन फेसबुकने केले आहे. आपले काही खासगी क्षण कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर, दोन जणांमध्ये बिनसतं आणि द्वेष भावनेतून असे फोटो फेसबुकवर अपलोड केले जातात, ते थांबवण्यासाठी हा फेसबुकचा प्रयत्न आहे. यापूर्वी फेसबुकने असं ऑस्ट्रेलियामध्ये केलं होतं, असं म्हटलं जातं, पण फेसबुककडून अजून कुणीही, तसा दुजोरा दिलेला नाही. खरं तर फेसबुकने असं युझर्सचा विश्वास जिंकण्यासाठीच केलं आहे, एक चूक केल्यानंतर आपलाच नग्न फोटो फेसबुकला पाठवण्याची वेळ येते त्याआधी काळजी घेणे, अशी चूक होणार नाही. याबाबत सावध राहणे गरजेचे आहे.
न्यूड फोटो मोबाईलमध्येही न काढलेला बरा
ज्यांचे न्यूड फोटो व्हायरल होत आहेत, ते फोटो व्हायरल होणे थांबवण्यासाठी, असं फेसबुकने असं केलं आहे. अनेक देशांमध्ये बॉयफ्रेन्ड आणि मित्रांकडून मुलींना फसवलं जातं, त्यांचे न्यूड फोटो काढले जातात, नंतर नात्यात अंतर पडतं, यानंतर हे 'न्यूड' फोटो फेसबुकवर बदल्याची भावना म्हणून अपलोड केले जातात, अशा फोटोंचा प्रसार थांबवण्यासाठी फेसबुकने हे पाऊल उचलले आहे.
पण फेसबुक नग्न फोटो अपलोड करून हे कसं थांबवणार?
फेसबुकने तुमच्या नग्न फोटोंचा गैरफायदा कुणी घेतला असेल, आणि त्याचा प्रसार थांबवायचा असेल, तर एक लिंक दिली आहे, त्यावर हा फोटो अपलो़ड करण्यास सांगितले आहे. हा फोटो अपलोड केल्यानंतर हा फोटो फेसबुक आणि मेसेंजरवर कधीच दिसणार नाही, आणि कुणी अपलोड करून व्हायरल करण्याचा प्रयत्न केला तरी अपलोड होणार नाही.
पण तुमच्या फोटोंबद्दल गोपनीयता ठेवली जाईल का?
फेसबुकने ब्लॅकमेलिंग किंवा त्रास देण्याच्या उद्देशाने जे फोटो अपलोड केले आहेत, त्यांचा प्रसार थांबवण्यासाठी हे केलं असलं, तरी या फोटोंविषयी फेसबुककडून गोपनीयता ठेवली जाईल का? हा देखील खरा प्रश्न आहे. तसेच असे फोटो व्हायरल होत असतील तर फेसबुककडून एक सल्ला देखील सुरूवातीला दिला जातो, आपल्या मित्राला किंवा फसवणाऱ्या त्या व्यक्तीशी बोला आणि असे फोटो डिलीट करण्य़ाविषय़ी सांगा. ब्रिटनमध्ये ज्यांचे फोटो फसवून व्हायरल केले जात आहेत, त्यांच्यासाठी एक हेल्पलाईन आहे, या हेल्पलाईनवाल्यांकडून फेसबुककडे तक्रार केल्यानंतर ते एक लिंक देतात, यावर फोटो अपलोड केल्यानंतर, हा फोटो फेसबुकच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर दिसत नाही, किंवा अपलोड होत नाही.
ब्रिटनमध्ये न्यूड फोटो देण्यासाठी लिंक
फेसबुकने ब्रिटनमध्ये न्यूड फोटो देण्यासाठी एक लिंक दिली आहे. यात तुमच्या मित्राने तुम्हाला फसवून तुमचा एखादा न्यू़ड फोटो काढला आणि तो फेसबुकवर अपलोड केला असेल, तर असा फोटो फेसबुकला पाठवा, यानंतर तो कुठेच दिसत नाही, तसेच अपलोड करणाऱ्याचं अकाऊंट स्पष्टीकरण देईपर्यंत फ्रीज केलं जातं, योग्य स्पष्टीकरण न आल्यास अकाऊंट बंद करण्याची देखील कारवाई होते.
फोटो पाहण्यासाठी पाच लोकांची समिती
फेसबुकचे ग्लोबल हेड ऑफ सेफ्टी अंटीगॉन डेव्हीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं, हे फोटो पाहण्यासाठी पाच लोकांची समिती असेल, हे एक प्रशिक्षित समिक्षक असतील, ते सर्व फोटोंना एक डिजिटल फिंगरप्रिंट देतील, त्याला हॅश म्हटलं जातं. याच्या डेटाबेसला एक कोडस्टोर दिला जाईल, जर कुणी हा फोटो अपलोड करण्याचा प्रयत्न केला, तर कोडमुळे लगेच उकल होणार आहे. हा फोटो फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मॅसेंजरवर ब्लॉक करण्यात येईल. तुमचा एक्स बॉयफ्रेंड ज्या मोबाईलने फोटो अपलोड करतो, त्यामधील तो फोटो असला पाहिजे नाही तर ते देखील निष्फळ आहे.