Wifi Extender Device : आजकाल प्रत्येकाच्याच घरात वाय-फाय (Wifi) आहे. प्रत्येक जण या वाय-फायद्वारे वर्क फ्रॉम होम (Work from Home) करतायत, टीव्ही, य़ुट्यूब सारख्या गोष्टी वापरत आहेत. मात्र अनेकांना वाय-फाय (Wifi) स्लो चालत असल्याच्या तक्रारी असतात. इंटरनेट कंपनी दिलेला स्पीड तितकाच असतो, मात्र तरीही नागरीकांना या समस्या सतावतात. अशात या स्लो इंटरनेट (Slow Internet) पासून सुटका मिळवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाय-फाय (Wifi) वापरणाऱ्या अनेकांना स्लो इंटरनेटच्या (Slow Internet) समस्यांना सामोरे जावे लागते. या स्लो इंटरनेटमुळे पैसै देऊन सुद्धा अनेकांना नेट वापरता येत नाही. त्यामुळे त्यांची निराशा होती. मात्र या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे WiFi Extender. हे डिवायस वापरून अनेकांना त्यांच्या इंटरनेटचा स्पीड वाढवता येणार आहे. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल, तर आज आम्ही तुम्हाला या डिव्हाइसबद्दल सविस्तर सांगणार आहोत. 


'हे' डिवायस वापरून पाहा 


वायफाय एक्स्टेंडर (WiFi Extender) आता बाजारात खूप सामान्य झाले आहे. त्यांचा आकार मॉस्किटो रिपेलंट मशीनसारखा आहे. ज्याला तुम्हाला फक्त पॉवर सॉकेटमध्ये प्लग करावे लागेल.वायफाय एक्स्टेंडर लावले की वायफायचा वेग आपोआप वाढू लागतो आणि घराच्या प्रत्येक भागात इंटरनेट देतो.


दरम्यान बाजारात वायफाय एक्स्टेंडरचे (WiFi Extender) अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि तुम्ही तुमच्या घरातील रुम्स आणि रुम्सच्या आकारानुसार तुमचा आवडता पर्याय निवडू शकता.हे वायफायचा वेग इतका वाढवते की घरात 10 खोल्या असल्या तरी प्रत्येक खोलीला सारखाच इंटरनेट स्पीड मिळेल.


किंमत किती?


वायफाय एक्स्टेंडर (WiFi Extender) 1500 ते  4000 रूपयांपर्यंत खरेदी केले जाऊ शकतात. त्यांच्यामध्ये फारसा फरक नाही, परंतु आकार जितका मोठा असेल तितके सिग्नल वाढू शकतात. तुम्ही तुमच्या घरानुसार वायफाय एक्स्टेन्डर निवडू शकता. 


दरम्यान तुम्हालाही वरील समस्या जर सतावत असेल तर नक्कीच तुम्ही वायफाय एक्स्टेंडर (WiFi Extender) खरेदी करा. हे एक्स्टेंडर एकदा वापरून पाहा, मग तुम्हाला इंटरनेटच्या स्पीडमध्ये फरक दिसेल.