वर्क फ्रॉम होममध्ये डबल डेटा देतेय ही कंपनी, कामासोबत मनोरंजनही होणार
वोडाफोन आयडीयाने केवळ २९९ रुपयांचा प्लान आणला
नवी दिल्ली : कोरोना वायरसपासून वाचण्यासाठी बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा दिली आहे. यासाठी सर्वांना असा डेटा प्लान हवाय जो ऑफीसच्या कामासोबत मनोरंजन देखील करेल. तसेच प्लानची किंमत देखील जास्त नसावी अशी देखील इच्छा असते.
ग्राहकांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी वोडाफोन आयडीयाने केवळ २९९ रुपयांचा प्लान आणला आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज ४ जीबी डेटा प्लान मिळतोय. कंपनी ३ प्लानमध्ये डबल डेटा ऑफर दिल्ली, मध्य प्रदेश, मुंबई, कोलकाता, पश्चिम बंगाल, ओडीशा, आसाम, राज्यस्थान आणि जम्मू काश्मीरसाठी असणार आहे.
२९९ रुपयांमध्ये ४ जीबी डेटा
वोडाफोन, आयडीया या प्लान अंतर्गत दररोज ४ जीबी डेटा मिळणार आहे. याची वैधता २८ दिवसांसाठी असणार आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल्सची सुविधा आणि दररोज १०० एसएमएस मिळतील. यासोबतच वोडाफोन प्लेचे ४९९ रुपयांचे सबस्क्रिप्शन आणि ZEE5 चे ९९९ रुपयांचे सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.
३९९ रुपयांचा प्लान
३९९ रुपयांच्या प्लानमध्ये वोडाफोन ३ जीबी डेटा देत आहे. ४४९ रुपयांच्या प्लानची वॅलिडीटी ५६ दिवसांची आहे. यामध्ये डबल डेटा ऑफर अंतर्गत रोज ४ जीबी डेटा मिळेल. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल आणि १०० एसएमएस रोज मिळतील. यासोबतच मनोरंजनासाठी वोडाफोन प्लेचे ४९९ रुपयांचे सबस्क्रिप्शन आणि ZEE5 चे ९९९ रुपयांचे सब्सस्क्रिप्शन मिळणार आहे.
आणखी एक प्लान
वोडाफोन आयडीया या प्लाननुसार डबल डेटा देत आहे. दररोज ४ जीबी डेटा ८४ दिवसांसाठी मिळणार आहे. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज १०० एसएमएस मिळणार आहेत. यासोबतच वोडाफोन प्लेचे ४९९ रुपयांचे सबस्क्रिप्शन आणि ZEE5 चे ९९९ रुपयांचे सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.