मुंबई : स्मार्टफोन हे एक असे उपकरण आहे ज्याने आपल्या जीवनात एक महत्त्वपूर्ण स्थान बनवले आहे. हे डिव्हाइस कार्यालयीन काम ते मनोरंजन या प्रत्येक गोष्टीसाठी वापरतो. स्मार्टफोन ( Smartphone ) वापरताना आपण बर्‍याच वेळा अशी चूक करतो, ज्यामुळे स्मार्टफोनच्या बॅटरी ( Battery Low ) आणि प्रोसेसरच्या ( mobile Processor ) गतीवर परिणाम होतो. यामुळे मोबाईलचे नुकसान किंवा स्फोट होण्याची शक्यताही वाढते. म्हणून आज आम्ही तुम्हाला त्या चुकांबद्दल सांगणार आहोत, जे आम्ही डिव्हाईस वापरताना अनेकदा करतो.


मोबाईल ओव्हर चार्जिंग ( Over Charging )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅटरी 50-60 टक्के आहे तरीही बहुतेक लोकं मोबाईल चार्ज करण्यास सुरुवात करतात. असे करु नये, कारण यामुळे बॅटरीवर दबाव येतो आणि बॅटरी खराब होण्याची किंवा स्फोट होण्याची शक्यता वाढते. मोबाइल फोनची बॅटरी 20 टक्के किंवा त्याहून कमी असेल तेव्हाच फोन चार्ज करा. यामुळे बॅटरीला हानी पोहोचत नाही.


वायब्रेशन मोड ( Vibration Mode )


बरेच लोकं नेहमीच फोन व्हायब्रेट मोडवर ठेवतात. आपणही हे करत असल्यास त्वरित थांबवा. कारण यामुळे फोनची बॅटरी लवकर संपते. तसेच, बॅटरीचं आयुष्य देखील कमी होतं. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच व्हायब्रेशन मोड वापरले पाहिजे.


स्वयं-ब्राइटनेस मोड ( Brightness )


फोनची बॅटरी वाचवण्यासाठी आपण ब्रायटनेस कमी करू शकता. याशिवाय आपण ऑटो-ब्राइटनेस मोड देखील वापरू शकता. यामुळे बॅटरीचा वापर कमी होतो.


 Wi-Fi, GPS बंद न करणे


आपण सर्व मोबाईलमध्ये वायफाय, जीपीएस आणि ब्ल्यूटूथ सारख्या कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यांचा वापर करतो. परंतु काम संपल्यानंतर आपण ते बंद करण्यास विसरतो. यामुळे, बॅटरीचा वापर वाढतो. काम पूर्ण झाल्यावर नेहमीच Wi-Fi, GPS आणि ब्लूटुथ बंद करा. यामुळे फोनच्या प्रोसेसरची गतीही वाढते.