World’s Most Expensive License number Plates: जगात अनेक कार उत्पादक कंपन्या असून एक से बढकर एक गाड्या आपल्याला पाहायला मिळतात. सर्वसामान्य व्यक्तीला परवडणाऱ्या कारपासून महागड्या कारपर्यंत अनेक गाड्या उपलब्ध आहेत. त्यामुळे दारात महागडी गाडी उभी असावी असं प्रत्येकाला वाटतं. पण कारप्रेमींचं नुसतं गाड्यांवर भागत नाही. त्या गाड्यांसाठी फॅन्सी नंबर घेण्यासाठीही चढाओढ लागते. या फॅन्सी नंबरसाठी मोठी रक्कम देखील मोजावी लागते. जगात काही गाड्यांचे नंबर इतके महाग आहेत की, त्याची किंमत ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल. पण कार मालकांनी श्रीमंती, प्रतिष्ठा आणि काहीतरी वेगळं करण्याच्या हेतूने या नंबर प्लेट विकत घेतल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्स डिजिटलच्या मते, अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामधील एका कारचा नंबर MM जगातील सर्वात महागड्या नंबर प्लेट पैकी एक आहे. या नंबर प्लेटची किंमत 24.3 मिलियन डॉलर आहे. अमेरिकेत दोन अक्षरांची नंबर प्लेट मिळणं कठीण आहे. तर इंग्लंडमध्ये F1 लायसन्स नंबर प्लेट जगातील दुसरा महागडा नंबर प्लेट आहे. याची किंमत सेल प्राइस 20 मिलियन डॉलर आहे. या कार मालकाने 2008 साली Essex Country Council कडून नंबर प्लेट विकत घेतली होती. 


अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील एका कारची नंबर प्लेट New York आहे. ही जगातील तिसरी महाग नंबर प्लेट असून त्याची किंमत 20 मिलियन डॉलर आहे. हा लायसेंस नंबर 1970 मध्ये जारी करण्यात आला होता. दुबईमध्ये एका कारचा लायसेंस नंबर D5 आहे. ही जगातील चौथी महागडी नंबर प्लेट आहे. याची किंमत 9.6 मिलियन डॉलर आहे. luxe Digital च्या मते या कारचा मालक भारतीय आहे. 


जगातील पाचवी महागडी नंबर प्लेट अबूधाबीत आहे. या गाडीचा नंबर 1 आहे. त्याची किंमत 9.5 मिलियन डॉलर आहे. 2008 मध्ये लिलावात ही नंबर प्लेट विकत घेतली होती.