Wrong fuel IN Car/ Bike : देशभरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालेली आहे. अशा वेळी गाडी खरेदी करताना पेट्रोल किंवा डिझेल वर चालणाऱ्या गाड्या बाजारात उपलब्ध आहेत. पण, समजा पंपावरील कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे किंवा तुमच्याकडूनच चुकून कधी गाडीमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल किंवा डिझेलऐवजी पेट्रोल टाकले तर काय होईल? तर  कधी कोणी पेट्रोलवर चालणाऱ्या गाडीत डिझेल भरतं तर कधी डिझेलवर चालणाऱ्या गाडीत पेट्रोल भरतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा पेट्रोल पंपावरही अशी चूक होते. त्यामुळे तुमच्यासोबतही असे होऊ शकते. असे झाल्यास, दुर्लक्ष अजिबात करू नका, अन्यथा तुमचे व कारचेही खूप नुकसान होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया की वाहनात चुकीचे इंधन किंवा पाणी भरल्यास त्याचा वाहनावर काय परिणाम होतो आणि असे झाल्यास काय करावे... 


चुकीच्या इंधनाचा परिणाम


जर तुमच्या कारमध्ये चुकीचे इंधन भरले असेल आणि तुम्ही लक्ष न देता कार सुरू केली. तर तुमच्या कारचे इंजिन खराब होऊ शकते. खराब झालेले इंजिन दुरुस्त करण्यासाठी खूप खर्च येतो कारण इंजिन हा कोणत्याही कारचा सर्वात किचकट आणि खर्चिक भाग असतो. जर तुमची पेट्रोल कार डिझेलने भरलेली असेल किंवा डिझेल कारमध्ये पेट्रोल भरले असेल तर, दोन्ही परिस्थितींमध्ये कार सुरू करताना इंजिन खराब होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. 


इंजिनचे नुकसान कसे टाळायचे?


अशा परिस्थितीत, जर तुम्हाला इंजिनचे नुकसान टाळायचे असेल तर कार सुरू करू नका. कारचे इग्निशन चालू करू नका आणि रोड सहाय्यकांना कॉल करून कार थेट टोव्ह करा. कंपनीच्या सेवा केंद्रात घेऊन जा. तेथील व्यावसायिकांना संपूर्ण समस्येबद्दल सांगा. तो तुमच्या कारची इंधन टाकी पूर्णपणे स्वच्छ करेल आणि जेव्हा इंधन टाकी पूर्णपणे स्वच्छ होईल, तेव्हा त्यामध्ये योग्यरित्या इंधन भरल्यानंतर कार वापरा.