अवघ्या 15 मिनिटात चार्ज होणार स्मार्टफोन! Xiaomi च्या `या` मोबाईलचे फीचर्स लीक
Xiaomi लवकरच Xiaomi 12T Series लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा मोबाईल लाँच होण्यापूर्वीच 12T मॉडेलचे फीचर्स लीक झाले आहेत
Xiaomi Smartphone Feature Leak: गेल्या काही दिवसात मोबाईल उत्पादन कंपन्या एकापेक्षा एक सरस असे मोबाईल बाजारात आणत आहे. त्यामुळे मोबाईलप्रेमींकडे अनेक पर्याय उपलब्ध आहे. त्यात Xiaomi लवकरच Xiaomi 12T Series लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा मोबाईल लाँच होण्यापूर्वीच 12T मॉडेलचे फीचर्स लीक झाले आहेत. XiaomiUI च्या रिपोर्टमधून या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. Xiaomi 12T हा एक नवीन प्रीमियम ग्रेड हँडसेट असेल. चला तर मग या स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊयात
Xiaomi 12T चे मॉडेल मीडियाटेक डायमेंशन 8100 अल्ट्रा एसओसीने परिपूर्ण असेल. त्याचबरोब चिपसेट 5nm प्रक्रियेवर आधारित असेल, असं बोललं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. त्याचबरोबर नवी मीडियाटेक चिप 8GB LPDDR5 रॅम आणि 128GB किंवा 256GB UFS 3.1 इंटरनल स्टोरेजसह असेल, अशी चर्चा आहे. हा स्मार्टफोन OLED डिस्प्लेला सपोर्ट करेल. त्यात 2712 x 1220 पिक्सेल रिझॉल्यूशन आहे. या व्यतिरिक्त स्क्रिन पॅनलमध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. त्याचबरोबर मागच्या बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. त्यात 108 मेगापिक्सल प्रायमरी शूटर असून सॅमसंग ISOCELL HM6 सेन्सर आहे.
या सेंसरला 8 मेगापिक्सल सॅमसंग S5K4H7 अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि दुसरा 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसह असेल. दुसरीकडे समोरच्या बाजूला 20 मेगापिक्सलचा Sony IMX596 सेल्फी शूटर असेल. मात्र लीक झालेल्या बातमीत बॅटरीच्या आकाराबाबत कोणतीही माहिती नाही. पण Xiaomi 12T मॉडेल 67W किंवा 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. त्यामुळे अवघ्या 15 मिनिटात फुल चार्ज होईल, असं बोललं जात आहे.