विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी संदेश पाठवून करा बाप्पाचं स्मरण

Vinayak Chaturthi 2024 Messages : विनायक चतुर्थीच्या द्या मराठमोळ्या शुभेच्छा 

Jun 10, 2024, 11:39 AM IST

विनायक चतुर्थीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. हा दिवस गणपतीच्या पूजेला समर्पित आहे. असे मानले जाते की या दिवशी (विनायक चतुर्थी 2024) बाप्पाची भक्तिभावाने पूजा केल्यास शुभ परिणाम प्राप्त होतात. यासोबतच ज्ञान, संपत्ती आणि सुख-शांतीचा आशीर्वाद मिळतो. या महिन्यात 10 जून 2024 रोजी असलेल्या विनायक चतुर्थीला अनेकजण उपवास करतात. अशावेळी एकेकांना विनायक चतुर्थीच्या मराठमोळ्या द्या शुभेच्छा. 

1/10

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

vinayak chaturthi Wishes in Marathi

सकाळ हसरी असावी  बाप्पाची मूर्ती समोर दिसावी  मुखी असावे बाप्पाचे नाव  सोपे होईल सर्व काम गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

2/10

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

vinayak chaturthi Wishes in Marathi

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ  निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

3/10

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

vinayak chaturthi Wishes in Marathi

रम्य ते रूप, सगुण साकार मनी दाटे भाव  पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहीवर  विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा 

4/10

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

vinayak chaturthi Wishes in Marathi

सजली सर्व धरती  नसानसात भरली स्फुर्ती  आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

5/10

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

vinayak chaturthi Wishes in Marathi

आपल्यामनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया

6/10

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

vinayak chaturthi Wishes in Marathi

गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक  तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी  जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी

7/10

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

vinayak chaturthi Wishes in Marathi

मोरया मोरया मी बाळ तान्हे  तुझीच सेवा करू काय जाणे  अन्याय माझे कोट्यानुकोटी  मोरेश्वरा बा तू घाल पोटी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

8/10

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

vinayak chaturthi Wishes in Marathi

तव मातेचे आत्मरुप तू ओंकाराचे पूर्ण रुप तू कार्यारंभी तुझी अर्चना विनायका स्वीकार वंदना विनायक चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

9/10

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

vinayak chaturthi Wishes in Marathi

तुझे नाम ओठी, तुझा ध्यास चित्ती तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती विनायक चतुर्थी निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !

10/10

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

vinayak chaturthi Wishes in Marathi

चतुर्भुजी मंडित हो, शोभती आयुथें करी परशुकमलअंकुश हो, मोदक पात्र भरी...