नवी दिल्ली : चायनीज मोबाईल निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi)ने आपल्या Mi Mix 2 या स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. कंपनीने हा प्रीमिअम स्मार्टफोन ऑक्टोबर 2017 मध्ये 35,999 रुपये या किमतीवर लॉन्च केला होता. मात्र, आता या फोनची किंमत कमी केली आहे.


6 हजार रुपयांनी कपात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाओमी (Xiaomi)ने आपल्या Mi Mix 2 या स्मार्टफोनच्या किंमतीत 6 हजार रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आता हा फोन ग्राहकांना 29,999 रुपयांना उपलब्ध होत आहे. कमी झालेली किंमत ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट सोबतच Mi Home वरही लागू आहे.


यापूर्वी कंपनीने या फोनच्या किमतीत 3000 रुपयांनी कपात केली होती. आता कंपनीने या सीरिजमधील पूढील स्मार्टफोन Mi Mix 2S लॉन्च केला केला आहे. मात्र, हा फोन भारतीय बाजारात अद्याप लॉन्च करण्यात आलेला नाहीये. तसेच भारतात हा फोन कधी लॉन्च होणार याची माहिती मिळू शकलेली नाहीये. असं म्हटलं जात आहे की, Mi Mix 2S लॉन्च झाल्यामुळे कंपनीने Mi Mix 2 च्या किमतीत कपात केली आहे.


डिस्प्ले


Mi Mix 2 या फोनमध्ये 1080 X 2160 पिक्सलचा 5.99 इंचाचा डिस्प्ले आहे. आयपीएस एलसीडी कॅपेसिटीव्ह टच स्क्रिन असलेल्या या डिस्प्लेमध्ये कोअरिंग गोरिल्ला ग्लासचा वापर करण्यात आला आहे.


प्लॅटफॉर्म 


शाओमीचा नवा फोन अँड्रॉईड 7.1 नोगटवर चालतो. यामध्ये क्वॉलकॉम MSM8998 स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर देण्यात आला आहे. शाओमी Mi Mix 2 फोनमध्ये 3500 mAhची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये USB Typs-C चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये नॉन-रिमुवल बॅटरीही आहे.


रॅम आणि मेमरी


फोनमध्ये कंपनीतर्फे मेमरी कार्ड स्लॉट वेगळा दिलेला नाहीये. यामध्ये 6 GB आणि 8 GB चे दोन वेरिएंट आहेत. फोन 64 GB, 128 GB आणि 256 GB इंटरनल मेमरीसोबत उपलब्ध आहे. मात्र, भारतीय बाजारात याचा केवळ 128 GB वेरिएंटचा फोन खरेदीसाठी उपलब्ध आहे.


कॅमेरा 


कॅमेरा क्वॉलिटीचा विचार केला तर शाओमीचे फोन खूपच चांगले मानले जातात. Mi Mix 2 या फोनमध्ये 12 MP चा बॅक कॅमेरा आणि 5 MP चा फ्रँट कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की या फोनचा फ्रँट कॅमेरा यूजरचा चेहरा ओळखण्यास सक्षम आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही आपला स्मार्टफोन लॉक-अनलॉक करु शकता. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आलं आहे.