मुंबई : चीनी मोबाईल कंपनी शाओमीचा Mi Max 2 फॅबलेट भारतात लॉन्च केला आहे. या फॅबलेटला Mi Maxचं अपग्रेड व्हर्जन मानलं जात आहे. शाओमीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फिचर्सही आहेत. या स्मार्टफोनची बॅटरी 5300 एमएएच तर कॅमेरा १२ मेगापिक्सल आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६.४४ इंचांचा डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज वेरिएंट आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.


शाओमीच्या या स्मार्टफोनची किंमत १६,९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनची ऑनलाईन आणि ऑफलाईन विक्री २७ जुलैपासून सुरू होणार आहे. रिलायन्स जिओसोबतच्या पार्टनरशीपमुळे या स्मार्टफोनवर रिलायन्स जिओच्या ग्राहकांना १०० जीबी अतिरिक्त 4G डेटा दिला जाणार आहे.


ड्यूएल सीम असलेला शाओमीचा Mi Max 2 मध्ये अँड्रॉईड ७.०वर आधारित मीयूआई ८ वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 1080x1920 पिक्सलचा फूल एचडी डिस्प्ले आहे. स्क्रीन डेनसिटी ३४२ पीपीआय आहे. या किंमतीमध्ये शाओमीचा हा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ऑन मैक्स, सॅमसंग गॅलेक्सी जे7 मैक्स, लेनोवो फॅब 2 प्लस, ओप्पो एफ3, ओप्पो एफ1एस, हॉनर 8 और हॉनर 8 लाइट या स्मार्टफोनना टक्कर देईल, असं बोललं जात आहे.