मुंबई : मागील वर्षी स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही बाजारात आणणार्‍या चायानीज स्मार्टफोन निर्माता कंपनी शिओमीने आता एक धमाकेदार एक्सचेंज ऑफर सुरू केली आहे. 


कॅशीफाय सोबत हातमिळवणी  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिओमी कंपनीने कॅशीफाय सोबत हातमिळवणी केली आहे. यानंतर गुरूवारी शिओमी कंपनीने एक्सचेंज ऑफर प्रोग्राम जाहीर केली आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे सोनीचा Xperia XZs मोबाईल असेल तर शिओमी या मॉडेलवर 9550 रूपये एक्सचेंजमध्ये देणार आहे. यामध्ये तुम्ही शिओमीचे अनेक फोन विकत घेऊ शकता.  


खास ऑफर 


ऑफिशिएल कंपनी www.mi.com वर तुम्हांला ऑफर पाहता येईल. 


या एक्सचेंज ऑफरमध्ये जुन्या मोबाईलफोनच्या मोबदल्यामध्ये तुम्हांला एक एक्सजेंज कूपन मिळेल. त्याचा फायदा तुम्हांला नवा मोबाईल खरेदी करताना होऊ शकतो. त्यासाठी पेजवर खास पेज बनवलं आहे. 


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फोनची कंडिशन पाहिली जाईल त्यानुसार त्याचे मूल्य ठरवले जाईल. या प्रोसेस दरम्यान तुम्हांला स्मार्टफोनचा IMEI नंबर लिहावा लागेल. हे पाहून MI अकाउंटमध्ये एक्सचेंज वॅल्यू कूपन अ‍ॅड होईल.  



तुम्ही कसा एक्सचेंज कराल मोबाईल ? 


तुम्हांला फोन एक्सचेंज करायचा असेल तर Mi एक्स्चेंज पेजवर क्लिक करून अकाऊंट बनवा.  
स्मार्टफोनचा ब्रॅन्ड सिलेक्ट करा, मॉडेल सिलेक्ट करा. 
येथे सॅमसंग, सोनी, मोटोसह 15 विविध ब्रॅन्डचे फोन एक्सचेंज करण्यासाठी उपलब्ध आहेत. 
येथे वेबसाईटवर तुमच्या फोनचं मूल्य काय असेल त्याचा अंदाज दिला जाईल. 
फोनचा IMEI नंबर दिल्यानंतर एमआई अकाऊंटमध्ये कूपन मिळेल. 


नवा फोन कसा मिळेल ? 


प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या पत्त्यावर एक्झिक्युटीव्ह पाठवला जाईल. तो तुमचा जुना फोन घेऊन जाईल. 
जुना फोन दिल्यानंतरच नवा स्मार्टफोन मिळणार आहे.  


अट काय ? 


तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल, त्यामध्ये दोष नसेल, सार्‍या स्क्रिन डिसेबल असणं आवश्यक आहे. 


तुमच्याकडे असलेला फोन शिओमीच्या लिस्टमध्ये असणं गरजेचं आहे. 


एक युजर केवळ एकदाच एक डिवाईस बदलू शकतो. 


एक्सचेंज कूपनची वैधवा केवळ 14 दिवसांची आहे. 


स्मार्टफोन विकत घेताना हा कूपन कोड वापरणं आवश्यक आहे.