नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपनी शाओमीने (Xiaomi) गुरूवारी भारतीय बाजारात दोन स्मार्टफोन लॉन्च करण्याव्यतिरिक्त बाजारात स्मार्ट टीव्हीही लॉन्च केला आहे. कंपनीने 'Mi LED TV 4 A Pro' हा ३२ इंची स्मार्ट टीव्ही लॉन्च केला आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत १२,८८८ इतकी आहे. कंपनीकडून यावर्षी लॉन्च करण्यात आलेला हा तिसरा एमआय टीव्ही आहे. याआधी जानेवारी महिन्यात कंपनीने ५५ इंची 'Mi TV 4X Pro' आणि ४३ इंची 'Mi TV 4 Pro' लॉन्च करण्यात आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'Mi LED TV 4 A Pro'टीव्हीची ७ मार्चपासून दुपारी १२ वाजता फ्लिपकार्ट, एमआय.कॉम आणि एमआय होमवर विक्री सुरु होणार आहे. या नवीन 'Mi LED TV 4 A Pro'मध्ये एचडी रेडी डिस्प्ले आणि २०W स्पीकर देण्यात आला आहे. याआधी लॉन्च करण्यात आलेल्या ५५ इंची 'Mi TV 4X Pro' ची किंमत ३९,९९९ रूपये आहे तर ४३ इंची 'Mi TV 4 Pro' ची किंमत २२,९९९ इतकी आहे.


'Mi LED TV 4 A Pro' हा ३२ इंची स्मार्ट टीव्हीमध्ये पॅचवॉल, अॅन्ड्राइड टीव्ही सपोर्ट, क्रोमबुक, यू-ट्यूब सपोर्ट आणि गूगल असिस्टंटची सुविधा देण्यात आली आहे. या टीव्हीला एचडी डिस्प्ले आणि ६४ बिट प्रोसेसर देण्यात आला आहे. 


Xiaomi Mi TV आपल्या कमी किंमत आणि उत्तम फिचर्ससाठी भारतीय बाजारात ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. गेल्या वर्षी दिवाळीमध्ये कंपनीने Mi TVच्या विक्रीचा नवा रेकॉर्ड केला होता. 'इंटरनॅशनल डेटा कॉरपोरेशन'ने २०१८च्या तिसऱ्या तिमाहीत Mi TV भारतातील पहिल्या नंबरचा स्मार्ट टीव्ही ब्रॅन्ड ठरला होता.