मुंबई : स्वस्तात चांगले फोन देणारी लोकप्रिय शाओमीने रेडमीने 4A या फोनचं नवं व्हेरिएंट लाँच केलं आहे. कंपनीने सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेडमी 4A च्या नव्या व्हेरिएंटची किंमत ६ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची खासियत म्हणजे इतका स्वस्त असूनही यामध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे.


रेडमी 4A ३१ ऑगस्टपासून अमेझॉन आणि MI इंडियाच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. रेडमी 4A हा लोकप्रिय फोन आहे.  कंपनीच्या या स्वस्त आणि चांगल्या फिचर्सच्या फोनमुळे धमाका होणार असल्याचे बोलले जात आहे. या फोनची माहिती शाओमीचे व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार जैन यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली आहे.


काय आहेत फीचर्स?


५ इंच आकाराची स्क्रीन
क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर
३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज
१३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
३१२० mAh क्षमतेची बॅटरी