मुंबई : चायनीज मोबाईल कंपनी शाओमी आणखी एक स्वस्त स्मार्टफोन घेऊन आली आहे. शाओमी रेडमी-5 आणि रेडमी-5 नोट प्रो हे स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. हे दोन्ही फोन ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉन, एमआय डॉट कॉम आणि एमआयच्या होम स्टोरमध्ये मिळणार आहेत.


किती आहे किंमत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेडमी-5 2GB रॅम आणि 16GB इंटरनल मेमरी असलेला फोन ७,९९९ रुपयांना आहे. तर 3GB रॅम आणि 32GB इंटरनल मेमरी असलेला फोन ८,९९९ रुपयांना आणि 4GB रॅम 64GB इंटरनल मेमरी असलेला फोन १०,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.


लॉन्च ऑफर


लॉन्च ऑफरमध्ये रेडमीच्या फोनवर रिलायन्स जिओकडून २,२०० रुपयांचं कॅशबॅक आणि 100GB अतिरिक्त डेटा मिळणार आहे. एमआय डॉट कॉमवर एसबीआयचं कार्ड वापरून फोन विकत घेतला तर ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे.


काय आहेत फोनची फिचर्स?


५.७ इंचाचा 720x1440 पिक्सल रिझोल्युशनचा एचडी डिस्प्ले


1.8 गिगाहर्ट्ज ऑक्टा-कोअर क्वालकोम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर


2GB रॅम आणि 16GB इंटरनल मेमरी


3GB रॅम आणि 32GB इंटरनल मेमरी


4GB रॅम 64GB इंटरनल मेमरी


मायक्रो एसडी कार्डनं मेमरी वाढवता येणार


4जी वीओएलटीई, वायफाय, ब्लूटूथ, 3.5 एमएम ऑडिओ जॅक


ब्लॅक गोल्ड, लाईट ब्ल्यू आणि रोज गोल्ड या रंगांमध्ये उपलब्ध


12 मेगापिक्सलचा रियर कॅमरा, 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा