मुंबई : चायनीज मोबाईल कंपनी शाओमी आणखी एक स्वस्त स्मार्टफोन घेऊन आली आहे. शाओमी रेडमी-5 हा स्मार्टफोन १४ मार्चला लॉन्च होणार आहे. लॉन्चिंगनंतर हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनवर उपलब्ध होणार आहे. तसंच Mi.com ही वेबसाईट आणि एमआयच्या स्टोरमध्येही हा स्मार्टफोन विकत घेता येईल.


१४ मार्चला लॉन्च होणार फोन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाओमी रेडमी-5 हा स्मार्टफोन १४ मार्चला दुपारी ३ वाजता लॉन्च होणार आहे. रेडमी 5 आणि रेडमी 5 प्लस हे स्मार्टफोन चीनमध्ये मागच्याच वर्षी लॉन्च झाले होते. या स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टिम 7.0 नोगट आहे. तसंच नॅनो ड्युअल सिम सपोर्टची सुविधाही देण्यात आली आहे.


५.७ इंचांचा डिस्प्ले


रेडमी-5 ला 720x1440 पिक्सल रिझोल्युशनचा ५.७ इंचांचा गोरिला ग्लासचा डिस्प्ले असेल. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर देण्यात आलाय. 2GB, 3GB आणि 4GB रॅमसोबत हा फोन उपलब्ध होईल. तसंच फोनमध्ये 16 GB आणि 32GB इंटरनल मेमरीचा पर्याय आहे.


१२ मेगापिक्सलचा कॅमेरा


मायक्रोएसडी कार्डचा वापर करुन तुम्हाला फोनची मेमरी वाढवता येणार आहे. रेडमी 5 या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसोबत १२ मेगापिक्सलचा रियर आणि सेल्फी फ्लॅशसोबत ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. या फोनला फिंगर प्रिंट सेन्सर असून 3,300 mAhची बॅटरी आहे. या स्मार्टफोनची किंमत ८ हजार रुपये असू शकते.