मुंबई : दमदार फिचर्स असलेला आणि तुमच्या बजेटमध्ये असणारा स्मार्टफोन शोधत आहात? तर मग, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, शाओमीचा रेडमी 5A (Xiaomi Redmi 5A) हा स्मार्टफोन तुम्ही अगदी स्वस्तात खरेदी करु शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाओमी कंपनीने हा स्मार्टफोन 'देशाचा स्मार्टफोन' या टॅग लाईनने लॉन्च केला होता. हा एक बजेट फोन असुन त्याचे फिचर्सही दमदार आहेत. 


नोव्हेंबर महिन्यात लॉन्च शाओमी कंपनीने लॉन्च केलेल्या या फोनची किंमत 5,999 रुपये होती. लॉन्चिंग वेळी कंपनीने फोनच्या पहिल्या 50 फोन्सवर 1,000 रुपयांची सूट देण्याची घोषणा केली होती. अशा प्रकारे त्यावेळी हा फोन 4,999 रुपयांत मिळत होता. पण आता हा फोन केवळ 4,000 रुपयांत मिळत आहे.


फेब्रुवारी ते जून महिन्यात क्रेडिट होणार कॅशबॅक


बिग बाजारच्या रिपब्लिक डे सेलमध्ये या फोनवर बंपर डिस्काऊंट मिळत आहे. बिग बाजारमध्ये हा स्मार्टफोन 5,499 रुपयांत मिळत आहे. मात्र, कंपनीद्वारे देण्यात येणाऱ्या ऑफरनुसार 1,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. अशा प्रकारे हा फोन 4,499 रुपयांत मिळत आहे. हा कॅशबॅक बिग बाजारच्या ई-वॉलेट फ्यूचर पे मध्ये फेब्रुवारी ते जून या महिन्यांत क्रेडिट केला जाईल.


10 टक्के डिस्काऊंट 


यासोबतच अॅक्सिस बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर खरेदीसाठी केल्यास तुम्हाला अतिरिक्त 10 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. अॅक्सिस बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 450 रुपयांचा (अधिकाधिक ५०० रुपये) अतिरिक्त डिस्काऊंट मिळणार आहे. अशा प्रकारे 5A (Xiaomi Redmi 5A)हा फोन तुम्हाला 4,049 रुपयांत मिळणार आहे. बिग बाजारची ही ऑफर 22 जानेवारीपासून सुरु झाली असून 28 जानेवारीपर्यंत राहणार आहे.


5A (Xiaomi Redmi 5A) फोनचे फिचर्स...


  • 720x1280 पिक्सल रिझॉल्युशन असलेला 5 इंचाचा एचडी डिस्प्ले


  • पिक्सल डेनसिटी 296 पीपीआय


  • क्वाड-कोअर क्वालकॉम 425 प्रोसेसर


  • Redmi 5A 2 GB रॅमच्या फोनसोबत 16GB इंटरनल मेमरी 128 GB पर्यंत मेमरीकार्डच्या मदतीने वाढवता येणार)


  • Redmi 5A 3 GB रॅमच्या फोनसोबत 32 इंटरनल मेमरी (128 GB पर्यंत मेमरीकार्डच्या मदतीने वाढवता येणार)


  • फोनमध्ये 3000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे


  • फोनचा स्टँडबाय टाईम 8 दिवस आणि 7 तास व्हिडिओ प्लेबॅक टाईम असल्याचा दावा करण्यात आला आहे


  • कॅमेरा - 13 MP आणि 5 MP