Xiaomi Redmi 5A : या स्मार्टफोनचा सेल सुरू, वापरा ही ट्रिक
देशाचा स्मार्टफोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Xiaomi Redmi 5A चा आज दुसऱ्यांदा सेल आहे.
मुंबई : देशाचा स्मार्टफोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Xiaomi Redmi 5A चा आज दुसऱ्यांदा सेल आहे.
हा सेल आज म्हणजे १४ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून Flipkart.com आणि mi.com या संकेतस्थळावरून हा फोन खरेदी केला जाऊ शकतो. या सोबतच कंपनी अनेक ऑफर्स देत आहे. या फोनमध्ये Jio च सीम वापरल्यावर १९९ रुपयात महिन्याभरात अनलिमिटेड कॉलिंगसोबतच अनलिमिटेड डेटा देखील मिळणार आहे. यामध्ये अट अशी आहे की दररोज फक्त १ जीबी डेटा वापरता येणार आहे. हाय स्पीड डेटा संपल्यानंतर इंटरनेटची स्पीड kbps प्रमाणे असणार आहे. १२ महिने संपल्यानंतर १०० रुपयाचे १० वाऊचर युझरच्या मायजिओ अॅप अकाऊंटमध्ये क्रेडिट केले जातील.
एका वेळी फक्त एकाच वाऊचरला रिडिम केलं जाऊ शकतं. ३० नोव्हेंबर २०१९ च्या अगोदर मायजियो अॅपच्या अगोदर ३०९ रुपये आणि त्याहून अधिक २०१ रुपये किंवा अधिक अॅड ऑनवर हे काम करणार आहे. म्हणजे या वाऊचर्सना तुम्ही अॅड करू शकत नाही. फक्त यातून तुम्ही रिचार्ज करू शकतो. फ्लिपकार्टवर ईएमआयचा देखील ऑप्शन उपलब्ध आहे. यामध्ये १६ जीबी इंटरनल मेमरीच्या वेरिएंटची किंमत ४,९९९ रुपये आहे. तर ३२ जीबी इंटरनल मेमरीच्या वेरिएंटची किंमत ६,९९९ रुपये इतकी आहे.
Redmi 5 A चे फिचर्स :
या स्मार्टफोनमध्ये ५ इंच फूल एचडी डिस्पेल देण्यात आली आहे. फोनला पावर देण्यासाठी १.४ गीगाहर्डजचे ४२५ क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर दिले आहे. फोनचा स्पीड कायम चांगला राहण्यासाठी यामध्ये २ जीबी आणि ३ जीबी रॅम बसवण्यात आली आहे. तसेच यामध्ये १६ जीबी आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी दिली आहे. फोटोसाठी या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
यासोबतच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डिवाइस पावर देण्यासाठी ३००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी ८ दिवस चालते. तसेच त्याचा व्हिडिओ करायचा असेल तर ७ तास चालू ठेवू शकतो. स्मार्टफोनला डार्क ग्रे, गोल्ड आणि रोज गोल्ड कलर वेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत.