नवी दिल्ली :  शाओमीने ने नोट ५ सीरीजचा पहिला फोन रेडमी नोट 5A लॉंच केला आहे. हा फोन Standerd आणि High या दोन एडिशनमध्ये आणला गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाओमी रेडमी नोट ५ मध्ये ५.५ इंचचा एच.डी कॅमेरा, स्पेनड्रॅगन ४३५ प्रोसेसर आणि २ जी रॅम आहे. यामध्ये १६ जीबी एक्सपेंडेबल स्टोरेज आहे. नव्या MIUI 9 वर हा फोन सुरू होतो.


अधिक वाचा : तुमचा फोन ट्रॅक होतोय! कसे ओळखाल ?


यामध्ये १३ एम.पी प्रायमरी आणि ५ एम.पी फ्रंट कॅमेरा , ३०८० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 


या फोनच्या हायर वॅरियंटमध्ये दोन रॅम आणि स्टोरेज वेरियंट्स दिले गेले आहेत. त्यातील एक ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी रॅमवाला तर दुसरा ४ जीबी आणि ६४ जीबी स्टोरेज वेरियंट्स आहे. या हाय वर्जनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर वेगळा देण्यात आला आहे. 


याव्यतिरिक्त यामध्ये स्नॅपड्रॅगन ४३५ प्रोसेसर आणि १६ एम.पी फ्रंट कॅमेरादेखील देण्यात आला आहे. बाकी सर्व स्पेसिफिकेशन रेडमी नोट 5A प्रमाणे दिले गेले आहेत.  हा फोन सध्या चीनमध्ये लॉंच झाला असून लवकरच भारतात येणार आहे. 


कोणत्या रंगात  ?


हे आकर्षक दिसणारे फोन गोल्ड, रोज गोल्ड, आणि प्लॅटिनम सिल्व्हर कलरमध्ये उपलब्ध आहेत. प्रिमियम फोनच्यामागेही फिंगरप्रिंट स्कॅनर असणार आहे. 


काय आहे किंमत


यातील सर्वात बेसिक फोन  (२ जीबी रॅम + १६ जीबी मेमरी) ची किंमत ६,७०० रुपये ठेवण्यात आली आहे. तर फिंगरप्रिंट सेसंरवाल्या ३ जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत साधारण ८,६०० असणार आहे. ४ जीबी रॅम असलेला फोन ११,५०० रुपयांपर्यंत उपलब्ध होऊ शकतो. चीनमध्ये हे फोन आजपासून Mi.com आणि JD.com वर उपलब्ध होणार आहेत.