मुंबई : शोओमी कंपनीचा ४८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला 'Redmi Note 7 Pro' स्मार्टफोन आज १३ मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. आज दुपारी १२ वाजल्यापासून ग्राहक रेडमी नोट ७ प्रो खरेदी करू शकतात. mi.com, फ्लिपकार्ट आणि एमआय होम स्टोअरवरून हा फोन खरेदी करता येऊ शकतो. गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनीने 'Redmi Note 7 Pro' लॉन्च केला होता. या फोनच्या लॉन्चिंगनंतर अनेक जण हा फोन खरेदी करण्यासाठी वाट पाहत होते. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या 'Redmi Note 7 Pro'ची भारतातील सुरूवातीची किंमत १३,९९९ रूपये इतकी आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या 'Redmi Note 7 Pro'ची किंमत १६,९९९ रूपये इतकी आहे. 


स्मार्टफोनची लॉन्च ऑफर - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'Redmi Note 7 Pro'च्या खरेदीवर एयरटेलकडून डबल डाटा ऑफर देण्यात येत आहे. एअरटेलकडून काही निवडक प्री-पेड रिचार्जवर १०० टक्क्यांहून अधिक डाटा ऑफर देण्यात येत आहे. 'रेडमी नोट ७ प्रो' खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ११२० जीबीपर्यंत ४ जी डाटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. याशिवाय जियोच्या वापरकर्त्यांना डबल डाटाचा फायदा देण्यासाठी शाओमीने रिलायन्स जियोशी भागीदारी केली आरहे. 



काय आहेत 'Redmi Note 7 Pro'ची वैशिष्ट्ये -


- ६.३ इंची एलसीडी एचडी डिस्प्ले
- रिजोल्यूशन २३४०*१०८०
- फ्रंन्ट आणि बॅक Corning Gorilla Glass 5 प्रोटेक्शन 
- ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६७५ प्रोसेसर 
- गेमिंगसाठी Adreno 612 GPU ची सुविधा
- ४८ मेगापिक्सल रियर कॅमेरा +  Sony IMX586 इमेज सेंसर + ५ मेगापिक्सल डेप्थ सेंसर
- १३ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
- AI डिटेक्शन, AI लाइट ट्रेल, AI पोट्रेट 2.0
- ४ हजार व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट
- ४०००mAh बॅटरी
- अॅन्ड्रॉइड ९ पाय बेस्ड MIUI 10 


Redmi स्मार्टफोन नवीन  'Aura Design'सह देण्यात आला असून त्यात वॉटरप्रुफ स्टाइल नॉचही देण्यात आला आहे. 'Redmi Note 7 Pro' स्पेस ब्लॅक, नेप्चून ब्लू आणि नेबुला रेड रंगात उपलब्ध करण्यात आला आहे.