नवी दिल्ली : चायनीज मोबाईल निर्माती कंपनी शाओमीने रेडमी 5 चा दुसरा फ्लॅश सेल 27 मार्चला आयोजित केला आहे. रेडमी 5 चा हा सेल अॅमेझॉन इंडिया आणि एमआय हॉट कॉम वर दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाला आहे. यापूर्वी रेडमी 5 च्या पहिल्या सेलला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या सेलला ही चांगला प्रतिसाद मिळण्याची आशा आहे. त्यामुळे ही संधी दवडू नका.


तीन व्हेरिंएट वर केला लॉन्च


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाओमीने आपल्या या स्मार्टफोन कॉम्पेक्ट पावरहाऊसवर हा फोन प्रमोट करत आहे. फोनचे फ्लॅट डिझाईन, सेल्फी कॅमेरा, फ्लॅट बॉर्डरचा डिस्प्ले आणि लॉन्ग बॅटरी लाईफमुळे हा हॅंडसेट वेगळा दिसतो. कंपनीने रेडमी 5 तीन व्हेरिंएटमध्ये लॉन्च केला होता. यात 2 GB, 3 GB आणि 4 GB  रॅम व्हेरिंएटचे तिसरे व्हर्जन आहे. सर्वात स्वस्त व्हेरिंएट 2 GB रॅम  आणि 16 GB इंटरनल स्टोरेजचा आहे. या व्हर्जनची किंमत 7,999 रुपये आहे.


फिचर्स


ड्यूल नॅनो सिम असलेल्या रेडमी 5 हा मीयू 9 वर चालतो. फोनमध्ये 5.7 इंचाचा  720x1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेला एचडी डिस्प्ले आहे. रेडमी 5 आणि 1.8 गीगा हर्टजचे ऑक्टाकोर क्वालकम स्नेपड्रेगन प्रोसेसर आहे. रेडमी 5 च्या कंपनीने 2 GB, 3 GB आणि 4 GB रॅम व्हेरिंएटमध्ये लॉन्च केले आहे. हा फोन 16 GB, 32 GB आणि 64 GB इनबिल्ट स्टोरेजसहीत येतो. तीन व्हेरिंएटची मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.


कॅमेरा


रेडमी 5 मध्ये 1.25 मायक्रोन पिक्सलसोबत 12 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. त्याचबरोबर यात एलईडी सेल्फी लाईटसोबत 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. कनेक्टिव्हीटीसाठी 4जी वीओएलटीय, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ वी4.2, जीपीएस/ए-जीपीएस आणि 3.5 एमएम ऑडियो जॅक दिलेला आहे. हा फोन ब्लॅक, गोल्ड, लाईट ब्लू आणि रोज गोल्ड रंगात उपलब्ध आहे. 


किंमत


रेडमी 5 चा 2 GB रॅम आणि 16 GB इंटरनल स्टोरेज असलेला फोन 7,999 रुपये, 3 GB रॅम व 32 GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 8,999 रुपये आणि 4 GB रॅम व 64 GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट10,999 रुपयांना उपलब्ध आहे. लॉन्च ऑफरमध्ये रिलायन्स जिओच्या तर्फे यावर   2,200  रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे.