नवी दिल्ली : मोबाईल फोन बनवणारी जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैंकी एक असलेली 'शाओमी' ही कंपनी आता आपल्या एका नव्या स्मार्टवॉचसहीत बाजारात येत आहे. शाओमी गोल डायल असणारं घड्याळ ३ जानेवारी रोजी लॉन्च करण्यासाठी तयार आहे. हे स्मार्टवॉच बरचसं 'हुअमी'च्या 'अमेजफिट जीटीआर'सारखं दिसतंय. यामद्ये गोल डायल आणि कलरफूल वॉच स्ट्रॅपही असेल. शाओमीचं सब-ब्रॅन्ड 'मिजिया'नं आपल्या अधिकृत वीबो अकाऊंटवर या घड्याळाचा एक टीझर शेअर केलाय, त्यात हा खुलासा झालाय. हे स्मार्टवॉच १.३९ इंच डेगोनल आणि ४५४ X ४५४ पिक्सल रिझोल्युशनसोबत असेल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जीएसएम एरिना'च्या सोमवारीच्या रिपोर्टनुसार, हार्ट रेट सेन्सॉर, एक्सेलेरोमीटर आणि बॅरोमीटर सहीत हे सर्व स्टँडर फिटनेस ट्रॅकिंग फिचरला सपोर्ट करतील. उल्लेखनीय म्हणजे, वॉटरप्रूफ असल्यानं पोहतानाही याचा वापर केला जाऊ शकेल. शाओमी वॉच कॉलर सिल्ह्वर, गोल्ड आणि ब्लॅक अशा तीन रंगांत उपलब्ध असेल. 



उल्लेखनीय म्हणजे, शाओमी या वर्षी अनेक नवीन फिचर फोन घेऊन येण्याच्या तयारीत आहेत. परंतु, सोबतच कंपनी इतर गॅझेटसवरही भर देत आहे. कंपनी नव्या इअरबड्ससोबत घरातील इतर वस्तूही भारतात लॉन्च करण्याचा विचार करत आहे.