नवी दिल्ली : शाओमीची इकोलॉजिकल चेन कंपनी ZMIने आतापर्यंत अनेक प्रोडक्ट लॉन्च केले. पॉवर बँक, वायरलेस चार्जर, डेटा केबल, कार चार्जर, पोर्टेबल स्पीकर असे अनेक प्रोडक्ट्स सामिल आहेत. आता कंपनीने लोकांना गरमीपासून वाचवण्यासाठी एक पोर्टेबल फॅन लॉन्च केला आहे. सध्या हा फॅन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतात याच्या लॉन्चिंगबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा फॅन सोबत घेऊन कुठेही जात येऊ शकतं. ZMI पोर्टेबल फॅन एक एन्ट्री लेवल प्रोडक्ट आहे. ZMI Portable Fan चीनमध्ये 59 yuan या किंमतीत लॉन्च करण्यात आला. भारतीत रुपयांत ही किंमत जवळपास 600 रुपये इतकी आहे. हा फॅन अतिशय कॉम्पॅक्ट असून बाहेर किंवा आत कुठेही अगदी सहज वापरता येणारा आहे. या फॅनचं डायमीटर 107.8mm  असून यात सात ब्लेड आहेत. यात 3,350mAh LG रिचार्जेबल बॅटरी देण्यात आली आहे. बेस लेवल स्पीडवर याचा वापर केल्यास 12 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.


फोटो सौजन्य : Jd.com

या फॅनमध्ये तीन स्पीड लेवल देण्यात आला आहे. पहिल्या स्पीड लेवलमध्ये 4.5 तास बॅटरी बॅकअप मिळू शकतो. दुसऱ्या लेवल स्पीडमध्ये 9 तास बॅटरी बॅकअप मिळू शकतो. हे मॉडेल JD.com वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. 


फॅन USB 2.0 पोर्टद्वारे चार्ज करता येतो. 5 तासांमध्ये बॅटरी संपूर्ण चार्ज करता येते.


ZMI Portable Fan आणखी एका दुसऱ्या व्हर्जनमध्येही उपलब्ध आहे. त्यात कंपनीने 2600mAhची बॅटरी दिली आहे. कंपनीने या व्हर्जनची किंमत 49yuan ठेवली आहे. भारतीय रुपयाप्रमाणे ही किंमत 500 रुपयांच्या जवळपास आहे.