नवी दिल्ली : चीनमधील स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच बाजारात घेऊन येत आहे. या आधी शाओमीने ४८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च केला होता. काही दिवसापूर्वीच सॅमसंग कंपनीने फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला होता. शाओमी कंपनी देखील अशा स्मार्टफोनवर काम करीत आहे. लवकरच शाओमीचा हा स्मार्टफोन बाजारात येणार आहे. अद्याप, स्मार्टफोनला नाव देण्यात आले नाही. परंतु, या स्मार्टफोनला शाओमी ड्युअल फ्लेक्स किंवा शाओमी मिक्स असे नाव देणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


फोल्डिंग स्मार्टफोनचा व्हिडिओ 


शाओमी कंपनीचे उपसंचालक वांग जियांग यांनी या स्मार्टफोनचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये डबल फोल्ड स्मार्टफोन वापरताना दिसत आहेत. वांग जियांग यांनी ट्विटरवर अशी पोस्ट अपडेट केली की, या अप्रतिम स्मार्टफोनसह आमच्या कंपनीचे उपाध्यक्ष आणि सहसंस्थापक बिन लिन यांचा व्हिडिओ शेअर करताना मला आनंद होतो आहे. तसेच हा जगातला पहिला डबल फोल्डेबल स्मार्टफोन असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


 



 


शाओमीच्या फोल्डेबल स्मार्टफोनची वैशिष्ट्ये


शाओमीच्या फोल्डेबल स्मार्टफोनची किंमत अद्याप स्पष्ट झाली नाही. २४ फेब्रुवारीला हा स्मार्टफोन मोबाइल वर्ल्ड शोमध्ये सादर करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे सॅमसंग कंपनीनेदेखील त्यांचा फोल्डेबल स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यात लॉन्च करणार असल्याची घोषणा केली होती. दोन्ही कंपनींचे स्मार्टफोन एकाचवेळी लॉन्च झाल्यावर बाजारात बदल दिसणार आहे.