शाओमीचा रेडमी गो लवकरच होणार लॉन्च
हा सर्वाधिक चर्चेत असणारा स्मार्टफोन ठरणार आहे.
नवी दिल्ली - शाओमी कंपनीचा स्मार्टफोन रेडमी ७ लवकरच बाजारात दाखल होणार आहे. याची माहिती शाओमी कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. कंपनी या फोनसह इतर दोन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. त्यामध्ये रेडमी गो हा सर्वाधिक चर्चेत असणारा स्मार्टफोन ठरणार आहे. कंपनीच्या अहवालानुसार, शाओमी कंपनी येत्या काही दिवसांत रेडमी नोट ७, रेडमी ७ प्रो, रेडमी गो हे तीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. शाओमी कंपनीचा रेडमी गो स्मार्टफोनमध्ये काय खास असणार? यांची माहिती समोर आली आहे. हा स्मार्टफोन रेडमी ५ए सारखा असणार आहे. महत्वाची माहिती अशी आहे की, या स्मार्टफोनची किंमत ५ हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. या आधी शाओमीने त्यांचा ६ए स्मार्टफोन ६ हजार रुपयात बाजारात आणला होता. स्मार्टफोनची किंमत बाजारात असलेल्या इतर स्मार्टफोनच्या तुलनेत कमी असल्यामुळे ग्राहकांनी ६ए ला चांगलीच पसंती दर्शविली होती. यामुळे शाओमी कंपनीने रेडमी गो स्मार्टफोनची किंमत कमी करण्याचा विचार केला आहे.
रेडमी गो स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये ५ इंच एलसीडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये १ जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोअरेज देण्यात आला आहे. तसेच माइक्रोएसडीच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत स्टोअरेज वाढवता येणारा आहे. हा स्मार्टफोन ऍन्ड्राइड व्हर्जन ८.१ ला सपोर्ट करणार आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध होणार आहे.