नवी दिल्ली: चीनमधील स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीला भारतीय बाजारात ग्राहकांची चांगलीच पसंती मिळते आहे. चीनची वेबसाइट टीइएनएएच्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात शाओमी एक नवीन धमाकेदार रेडमी ७ हा स्मार्टफोन बाजारात आणत आहे. रेडमी ७ हा स्मार्टफोन पर्पल आणि ग्रेडिएंट या दोन कलरमध्ये उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युल रिअर कॅमेरा असणार आहे. शाओमी रेडमी ७ स्मार्टफोनच्या किंमतीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच शाओमी कंपनी रेडमी नोट ७ स्मार्टफोनदेखील लॉन्च करणार असल्याची माहिती टीइएनएएच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


शिओमी रेडमी ७चे वैशिष्ट्ये 



स्मार्टफोनचा डिस्प्ले ६.३ असणार आहे. ३ वेरिएंन्टमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. रेडमी ७ कंपनीचा ४८ मेगापिक्सल असलेला हा पहिला स्मार्टफोन ठरणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये ३ रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनमधील बॅटरीची क्षमता ४ हजार एमएएच असणार आहे. 


चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमी २०१९ मध्ये आणखी नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. १० जानेवारी रोजी एका कार्यक्रमादरम्यान एक अन्य स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे .या हॅण्डसेटचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. हा फोन ३ कॅमेरा सेटअपसह येण्याची अपेक्षा आहे. जिथे प्राथमिक सेन्सर ४८ मेगापिक्सल असणार तसेच एक वाइड एंगल लेन्स असेल