नवी दिल्ली : यामाहाने भारतात सुपर बाईक  एम् टी - ०९ ची नवीन आवृत्ती आणली आहे.


सुपर बाईकची वैशिष्ट्यं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मोटरसायकल वैशिष्ट्य  म्हणजे यामध्ये नव्याने विकसित करण्यात आलेलं ८४७ सी.सी. आणि ३ - सिलेंडर इंजिन. यामध्ये अॅंटी - लॉक ब्रेकींग यंत्रणासुद्धा असणार आहे. या मोटरसायकलची किंमत  १०.३३ लाख रुपये असणार आहे.


खास तरुणाईसाठी


तरुणाईला डोळ्यासमोर ठेऊन ही सुपर बाईक भारतीय बाजारात आणली आहे. जे तरुण सध्या ६०० सी.सी.  च्या मोटरसायकल वापरत आहेत आणि ज्यांना अधिक शक्तिशाली मोटरसायकलकडे वळायचं आहे, त्यांच्यासाठी ही बाईक एक पर्वणीच ठरणार आहे.


यामाहा टच


हे मॉडेल पूर्णपणे तयार स्वरूपात आयात केलं जाणार आहे. या मॉडेलमध्ये इतरही अनेक आधुनिक तांत्रिक वैशिष्ट्यांचा समावेश केलेला आहे. यामाहा सुपर बाईकसाठी ओळखली जाते. या मॉडेलमध्येही या खुबी आहेत.