PICS: लॉन्चिंगपूर्वीच बाजारात Yamahaच्या बाईकचा धुमाकूळ
दुचाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या यामाहा कंपनीने आपल्या नव्या आणि दमदार बाईकवरुन पडदा हटवला आहे. ही नवी बाईक भारतीय बाजारात लवकरच लॉन्च करण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : दुचाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या यामाहा कंपनीने आपल्या नव्या आणि दमदार बाईकवरुन पडदा हटवला आहे. ही नवी बाईक भारतीय बाजारात लवकरच लॉन्च करण्याची शक्यता आहे.
Yamaha R3 नावाने लॉन्चिंग
यामाहाच्या नव्या बाईकला Yamaha R3 (यामाहा आर3) या नावाने लॉन्च केलं जाण्याची शक्यता आहे. Yamaha R3 या बाईकचं मॉडल इंडोनेशियात चालत असलेल्या मॉडेल प्रणाणेच असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नव्या बाईकच्या लॉन्चिंगनंतर यामाहा कंपनी पुन्हा एकदा भारतीय बाजारात आपली छबी कायम राखेल असं कंपनीला वाटत आहे. जाणून घेऊयात या दमदार बाईकच्या फिचर्स संदर्भात...
ऑटो एक्सपोमध्ये होऊ शकते लॉन्च
Yamaha R3 बाईकचं उत्पादन सध्या इंडोनेशियात असलेल्या कारखान्यात सुरु आहे. भारतीय बाजारपेठेसाठी Yamaha R3 बाईकला इंडोनेशियात असेंबल करण्यात येणार आहे.
3 रंगांमध्ये होणार उपलब्ध
यामाहाची नवी बाईक Yamaha R3 तीन रंगांमध्ये उलब्ध होणार आहे. यामध्ये ब्लू, व्हाईट, काळा या रंगांचा समावेश आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये ही बाईक लॉन्च केली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इंजिन
या स्पोर्ट्स बाईकमध्ये 321 cc चं 4 स्ट्रोक इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 42 PS ची पावर आणि 30 Nm चं टॉर्क जनरेट करतं. या बाईकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि मोनोशॉक रियर सस्पेंशन आहे.
डिस्क ब्रेक
बाईकच्या दोन्ही चाकांना डिस्क ब्रेकसोबतच अलॉय व्हिल देण्यात आलं आहे. यामुळे ही बाईक खूपच आकर्षक दिसते. दोन्ही टायर्स ट्युबलेस आहेत. गाडीचं वजन जवळपास 170 किलोग्रॅम आहे आणि ही गाडी 170 किमी प्रित तास या टॉप स्पीडने धावते. कंपनीने दावा केला आहे की, 0 ते 100 किमी स्पीड पकडण्यासाठी या बाईकला केवळ 5.5 सेकंदांचा वेळ लागतो.