Yamaha RX 100 Launch: यामाहा आरएक्स100... अनेकांचीच ड्रीम बाईक. नव्वदचं दशक गाजवणारी ही बाईक त्यावेळी अक्षरश: धुमाकूळ घालून गेली असं म्हणायला हरकत नाही. कारण, चित्रपट म्हणू नका किंवा रस्ते, जिथंतिथं ही बाईकच दिसत होती. आजही असे अनेकजण तुम्ही पाहिले असतील ज्यांनी त्यांच्याकडे असणारी ही बाईक जपून ठेवली असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दमदार लूक, बाईकचा आवाज आणि मायलेज या साऱ्याच्याच बाबतीत अग्रगणी असणाऱ्या या बाईकबद्दलचं प्रेम आणि तरुणाईमध्ये असणारं वेड आजही कमी झालेलं नाही. बीएमडब्ल्यू, जावा, एनफिल्ड, हायाबुजा या आणि अशा इतरही बाईकच्या शर्यतीत यामाहाची आरएक्स100 आजही तिची लोकप्रियता कायम टिकवून आहे. काय म्हणता, तुम्हीसुद्धा ही बाईक खरेदी करण्याचं स्वप्न पाहिलंय? ही बातमी तुम्हाला आनंदच देणार. कारण, आरएक्स100 पुन्हा तुमच्या भेटीला येतेय, तिसुद्धा नव्या रुपात. 


बाईकचे फिचर्स 


सूत्रांच्या माहितीनुसार आता ही बाईक टू स्ट्रोक इंजिनवरून थेट 4 स्ट्रोक इंजिनच्या रुपात लाँच केली जाईल. आधीच्या व्हेरिएंटमध्ये बाईकला 98CC चं इंजिन होतं. आता नव्या बाईकला मात्र 200 सीसीचं इंजिन देण्यात येणार आहे. हो, पण या इंजिनच्या बाईकला सुरु केल्यानंतर जुन्या बाईकसारखा आवाज मात्र होणार नाहीये. 


1996 मध्ये आलेल्या सरकारच्या नियमानंतर कंपनीकडून ही बाईक Discontinue करण्यात आली होती. ज्यानंतर इतक्या वर्षांनी ही बाईक एका नव्या रुपात सर्वांच्या भेटीला येणार आहे. यामाहाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या ईशिता चौहान यांनी याबाबतची माहिती दिली. 'ही बाईक बाजारात बरीच लोकप्रिय राहिली होती. बाईकची स्टाईलिंग आणि कमी वजन या घटकांनी तिला आणखी प्रभावीपणे अधिकाधिक बाईकप्रेमींपर्यंत पोहोचवलं', असं त्या म्हणाल्या. 


हेसुद्धा वाचा : International Driving Licence काढायचंय? पाहा नियम व अटी


 


सध्याच्या घडीला तरी या बाईकला भारतीय बाजारातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार नसून, येत्या काळात ती पुन्हा सर्वांच्या भेटीला येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. किंबहुना बाईक लाँच होण्याची तारीख मात्र त्यांनी स्पष्ट केलेली नाही. पण, काही महिन्यांतच तारीखही समोर येईल असं अनेकांचच म्हणणं आहे. तेव्हा आता ही बाईक लाँच झाल्यानतंर तिच्या बुकिंगचे विक्रम मोडले जातात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.