नवी दिल्ली : देशात आधारच वापर वेगाने वाढत आहे. आधार कार्डचा वपर आता इन्कम टॅक्स रेकॉर्डपासून ते बॅंक अकाऊंट, विमा पॉलिसी, गुंतवणुकीचे रेकॉर्ड, प्रॉव्हिडंट फंड आणि पेंशन अकाऊंटसहीत सर्वच गोष्टींसाठी होतो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण अनेकांना त्यांचं आधार कुठं वापरलं गेलंय हे माहिती नसतं. तर ते कसं बघावं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


लिंक


कुणीही https://uidai.gov.in/en या लिंकवर जाऊन आधार ऑथेंटिफिकेशन हिस्ट्रीवर क्लिक करू शकतात. ही आधार सर्व्हिसेस टॅबमध्ये उपलब्ध आहे. 


डिटेल


या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर स्क्रिनवर एक सिक्युरिटी कोड असतो. तो सुद्धा भरावा लागेल. नंतर तुम्ही जनरेट ओटीपी या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जातो. 


उपलब्ध आकड्यांचा पर्याय


इथे ग्राहकांना ऑथेंटिफिकेशनच्या प्रकारानुसार पर्याय निवडण्याची गरज आहे. जर कुणाला सर्वच आकडे बघायचे असेल तर ऑल पर्याय निवडू शकता. त्यानंतर गेल्या सहा महिन्यातीलही आकडे तुम्ही इथे बघू शकता.


ऑंथेटिफिकेशन


आधारचा वापर कुठे केला याची हिस्ट्री बघण्यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकणे गरजेचे आहे.


वापराची हिस्ट्री


एकदा ऑथेंटिफिकेशन यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला दिवस, वेळ, ट्रान्झॅक्शन आयडी आणि ऑथेंटिफिकेशन यशस्वी झालं की नाही, अशी माहिती मिळते. 


याची काळजी घ्या.


- या सेवेचा उपयोग करण्यासाठी मोबाईल नंबर आधारशी रजिस्टर्ड असला पाहिजे. याचा आधारच्या रेकॉर्डशी व्हेरिफिकेशन झालेलं असलं पाहिजे.