मुंबई : जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन वैतागले असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. दिल्ली सरकारने लोकांचा विचार करुन ब्लू प्रिंटची सुविधा सुरु केली आहे. नियोजनानुसार सर्व काही योग्य असल्यास, आपल्याला काही तासांमध्ये लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार आहे. लर्निंग लायसन्सच्या वाढत्या गर्दीमुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.


टच स्क्रीनवर चाचणी घेणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन योजनेनुसार पुढील वर्षापासून ट्रान्सपोर्ट ऑफिसच्या कामात घट होणार आहे. कारण, मोटार लायसेन्स ऑफिसमध्ये लाईन लावण्याची गरज पडणार नाही. मोटार लायसेन्स ऑफिसमध्ये पुढील वर्षी टोकन सिस्टम लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला हेल्प डेस्कवरुन टोकन देण्यात येणार आहे. त्यानंतर ते टोकन आपणास सांगितलेल्या काउंटरवर जमा करावं लागेल. लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी टच स्क्रीनवर एक चाचणी असेल.


एकूण चार भाषेत चाचणी


याआधी ही चाचणी हिंदी आणि इंग्लिश भाषेत असायची, आता यात पंजाबी आणि उर्दू भाषेचा यात समावेश करण्यात येणार आहे. लर्निंग चाचणी पास झाल्यावर लायसन्स लगेच हातात देण्यात येणार आहे. मोटार लायसेन्स ऑफिसचे कामे दिल्लीतील इंटीग्रेटिड मल्टी-मॉडल ट्रांझिस्ट सिस्टम ही कंपनी बघते. या कामाची जबाबदारी नवीन एजन्सीला देण्याची तयारी केली जात आहे. टेंडर फायनल झाल्यानंतर एप्रिलपासून नवीन प्रणाली लागू केली जाऊ शकते.


अशी पद्धत असेल


माहितीनुसार तयार केलेल्या ब्लू प्रिंटनुसार टच स्क्रिनच्या माध्यमातून लर्निंग चाचणी होणार आहे. टोकन घेतल्यानंतर मोटार लायसेन्स ऑफिसच्या मोठ्या स्क्रिनवर वेटिंग टाईम दाखवले जाणार आहे. ज्या प्रकारे एटीएमचा वापर केला जातो, तसेच काऊंटरवर गेल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सची चाचणी होईल. पास झाल्यावर लगेच ड्रायव्हिंग लायसन्स  हाती मिळणार आहे.


१० मिनिटांची कम्प्युटर चाचणी


दिल्लीत ड्रायव्हिंग लायसन्ससाठी १० मिनिटांची चाचणी असते. कम्प्युटरची माहिती नसलेले लोकांना डी.एलची चाचणी पास करणे कठीण जाते. यामुळे दिल्ली सरकारनं वेगळं नियोजन केलं आहे. दिल्लीत प्रत्येक वर्षी १० लाख लर्निंग लायसन्स तयार केले जातात.