नवी दिल्ली : जर तुम्हाला लहान स्क्रिन असलेला iPhone विकत घ्यायचा असेल तर तुम्ही iPhone SE चा विचार करू शकता. सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन एक जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. ज्यानुसार तुम्हाला स्वस्तात iPhone घेण्याची संधी मिळणार आहे. 


मोठा डिस्काऊंट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

iPhone SE या फोनवर अ‍ॅमेझॉन साईटवर ८,००१ रूपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. म्हणजे २६ हजार रूपयांचा हा स्मार्टफोन तुम्ही केवळ १७ हजार ९९९ रूपयांमध्ये खरेदी करू शकता. 


एक्सचेंज ऑफर आणि ईएमआय


या स्मार्टफोनवर १५ हजार रूपयांपर्यंतचा एक्सचेंज ऑफर सुद्धा दिला जात आहे. सोबतच ईएमआयवर खरेदी केल्यास आयसीआयसीआय बॅंक क्रेडीट कार्ड होल्डर्सना १ हजार ५०० रूपयांपर्यंतची कॅशबॅक दिली जाणार आहे. या फोनसाठीची ईएमआय ८३६ रूपये प्रति महिना अशी आहे. 


फिचर्स


अ‍ॅपल iPhone SE iOS १० सोबत येतो नंतर iOS 11 वर अपग्रेड करता येऊ शकतो. या स्मार्टफोनला ४ इंचाचा डिस्प्ले दिला असून 1136X640 पिक्सलचं रिझोल्यूशन दिलं आहे. iPhone SE मध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलंय. तसेच यात १२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि १.२ मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा दिला गेलाय. 


का आहे किंमत कमी?


भारत सरकारकडून इंपोर्ट ड्यूटी वाढवल्यावर अ‍ॅपलने नकत्याच भारतात आपल्या फोनच्या किंमती वाढवल्या आहेत. पण iPhone SE वर दर वाढीचे परीणाम पडले नाहीयेत, कारण हा स्मार्टफोन भारतातच तयार केला जातो.