WhatsApp चॅट फिंगरप्रिंटने लॉक, अनलॉक होणार; जाणून घ्या कसे?
WhatsAppमध्ये अपडेट करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हाट्सएपवरुन (WhatsApp) दररोजच्या जीवनात आपल्या मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत चॅटिंगच्या माध्यमातून आपण जोडलेले असतो. आता दुसऱ्यांच्या नजरांपासून व्हाट्सएप चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी व्हाट्सएपकडून नुकतंच अपडेट देण्यात आले आहे. 'फिंगरप्रिंट लॉक' असे अपडेट करण्यात आले आहे. या अपडेटची व्हाट्सएपवर चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी मदत होणार आहे.
अॅन्ड्रॉइडवर असे करा चॅट लॉक -
- सर्वात आधी अॅन्ड्रॉइडवर व्हाट्सएप स्मार्टफोनमध्ये चॅट सुरु करण्यासाठी व्हाट्सएप एडिशन २.१९.२२१ असणे गरजेचे आहे.
- त्यानंतर अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनवर व्हाट्सएप 'सेटिंग्स'च्या ऑप्शनमध्ये, 'प्रायव्हसी'वर क्लिक करा
- 'प्रायव्हसी'वर क्लिक केल्यानंतर शेवटचा ऑप्शन 'फिंगरप्रिंट अनलॉक'वर स्क्रॉल करा
- फिंगरप्रिंट अनलॉकवर क्लिक केल्यावर, बोटाने व्हाट्सएप लॉक / अनलॉक करण्यासाठी फिंगरप्रिंट सेन्सर वापरू इच्छिता किंवा नाही असा कन्फर्म करण्यासाठी ऑप्शन येईल.
IOSवर असे करा चॅट लॉक -
- अॅन्ड्रॉइडप्रमाणेच आयओएसवरही व्हाट्सएप एडिशन २.१९.२० असणे आवश्यक आहे.
- सर्वात आधी iPhoneच्या व्हाट्सएप सेटिंग्जमधून प्रायव्हसीवर क्लिक करा
- स्क्रीन लॉक करण्यासाठी खाली स्क्रॉल करा आणि टॉगल सेट करा
- ज्यावेळी टॉगल सुरु कराल, त्यावेळी iPhoneवर टच आयडी व्हाट्सएपसाठी सक्रिय केला जाईल. तुमचा फेस आयडी असल्यास, तुमचा चेहरा व्हाट्सएप चॅट अनलॉक करेल.