WhatsApp Rules : व्हॉट्सअॅप हे एक असे प्लॅटफॉर्म आहे जे जगभरात सर्वाधिक पसंत केले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या स्मार्टफोनमध्ये नक्कीच व्हॉट्सअॅप  आहे. परंतु तुम्हाला त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणं आवश्यक आहे कारण जर तुम्हाला या गोष्टी माहित नसतील तर तुम्हाला समस्या असू शकते, समस्या अशी देखील असू शकते की तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते. व्हॉट्सअॅप ग्रुपशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रुपवर गुन्हेगारी मजकूर शेअर करू नका
तुम्ही व्हॉट्सअॅप ग्रुपवर गुन्हेगारी अॅक्टिव्हिटीशी संबंधित मजकूर शेअर केल्यास ग्रुपमधील इतर सदस्यांना त्रास होऊ शकतो आणि त्यांच्यापैकी कोणी पोलीस किंवा आयटी सेलकडे तक्रार केल्यास तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकते.


बालगुन्हेगारीशी संबंधित कोणताही व्हिडिओ शेअर करू नका
जर तुम्ही बालगुन्हेगारीशी संबंधित कोणताही व्हिडिओ गंमतीच्या दृष्टिकोनातून ग्रुपवर शेअर केलात तर तुम्हाला त्याचा फटका तुरुंगात जावे लागू शकते कारण ग्रुपमधील कोणत्याही सदस्याने ही माहिती पोलिसांना दिली तर तुम्हाला जेल होऊ शकतं.


दहशतवादी कारवायांचे समर्थन करणारा व्हिडिओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवला गेला तर त्याची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी. तसं न केल्यास आणि तरीही त्याची माहिती लीक झाल्यास ग्रुपमधील सर्व सदस्यांना तुरुंगात जावे लागू शकते.


हिंसाचाराचा व्हिडिओ
काही लोक अनेकदा व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये हिंसेशी संबंधित व्हिडिओ शेअर करतात, पण असं करणं हा संपूर्ण गुन्हा आहे आणि तसं केल्यास तुरुंगास भोगावा लागू शकतो.