पापलेट मासाविषयी तुम्हाला हे माहित आहे का?
पापलेट मासा कसा दिसतो, असं माहित नसणारा माणूस सापडणे कठीण आहे. पापलेट मासा सर्वांनाच खायला आवडतो
मुंबई : पापलेट मासा कसा दिसतो, असं माहित नसणारा माणूस सापडणे कठीण आहे. पापलेट मासा सर्वांनाच खायला आवडतो. याला इंडियन बटर फिश देखील म्हणतात. हा मासा खायला चवदार आहे. पापलेटमध्ये अन्न शोषणासाठी असणारे प्रथिनं खूप मोठ्या प्रमाणात आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात ओमेगा थ्री फॅट्टी अॅसिड देखील यात मिळतं.
पापलेटचं खरं नाव पाँफ्रेट. प्राँफ्रेट शब्दाचा अपभ्रंश होऊन पापलेट असं मराठीत त्याचं नाव पडलं. काही लोक पपलेटही त्याला म्हणतात. प्राँफ्रे़ट मासे तीन प्रकारचे आहेत. करडा अथवा रूपरी पाँफ्रेट, काळा पाँफ्रेट आणि अर्थातच पांढरा पाँफ्रेट.
पण सर्वात महत्वाचं म्हणजे करडा आणि पांढरा पाँफ्रेट स्ट्रोमॅटिइडी या मत्स्यकुळातले असले, तरी ते वेगवेगळ्या वंशाचे आहेत. करडा पाँफ्रेट स्ट्रोमॅटियस वंशाचा आणि पांढरा काँड्रोप्लायटीस वंशातला आहे. काळा पाँफ्रेट फोर्मिओनिडी मत्स्यकुळातला असून फोर्मिओ वंशाचा आहे.