फक्त १० हजार रुपयांमध्ये खरेदी करु शकता हे फोन
खूप महागडा फोन घ्यायचा नसेल तर काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत.
मुंबई : लॉकडाऊन काळात जर तुमचा फोन खराब झाला असेल आणि नवा फोन घेण्याचा विचार असेल तर आता बजेटमध्ये बसणारे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. खूप महागडा फोन घ्यायचा नसेल तर काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. अतिशय महागडे नसणारे पण 10 हजारांपर्यंत काही चांगले फिचर्स असणारे स्मार्टफोन घेता येऊ शकतात.
सॅमसंग गॅलेक्सी एम 30
सॅमसंगने बजेट फोन बाजारात आणला आहे. Samsung Galaxy M30 आता केवळ 10,000 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. 6.40 इंची डिस्प्ले, Samsung Exynos 7904 प्रोसेसर, 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, 13+5+5 मेगापिक्सल रियर कॅमेरा, 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज, 5000mAh बॅटरी, Android 8.1 Oreo ओएस असे फिचर्स या फोनला देण्यात आले आहेत.
रियलमी सी 3
realme c3 बाजारात 10 हजारांहून कमी किंमतीत हा फोन उपलब्ध आहे. या फोनची किंमत 8000 रुपये इतकी आहे. कमी किंमतीत चांगल्या फिचर्समुळे हा फोन बाजारात इतर कंपन्यांना चांगलीच टक्कर देत आहे. 6.20 इंची डिस्प्ले, MediaTek Helio P70 प्रोसेसर, 13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, 13+2 मेगापिक्सल रियर कॅमेरा, 4230mAh बॅटरी, Android Pie, 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असे या फोनचे स्पेसिफिकेशन्स आहेत.
रियलमी 5
realme 5 हा फोनही 10 हजारांपर्यंत उपलब्ध आहे. 5000mAh बॅटरी, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर, Android Pie, 13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, 12+8+2+2 मेगापिक्सल रियर कॅमेरा, 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज या फोनला देण्यात आला आहे.
रियलमी यू 1
Realme U1 या फोनला 6.30 इंची डिस्प्ले, MediaTek Helio P70 प्रोसेसर, 25 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, 13+ 2 मेगापिक्सल रियर कॅमेरा, Android 8.1 Oreo, 3500mAh बॅटरी देण्यात आली आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असणारं मॉडेल 10 हजारांपर्यंत बाजारात आहे. पण याच फोनमधील 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनसाठी काहीशी जास्त किंमत मोजावी लागणार आहे.