QR Code Payment Process in Marathi: क्यूआर कोड आणि बारकोड  दिसायला एकमेकांपेक्षा थोडे वेगळे असतात. मात्र, त्यांना स्कॅन करावे लागते. त्यानंतर आपल्या जी माहिती हवी असते ती तात्काळ मिळते. आता डिजिटल युगात वावरत असताना नवी क्रांती घडली आहे. नोटबंदी आणि कोरोना काळात लॉकडाऊननंतर डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ झाली. आपण पाच आणि दहा रुपयांसाठी पैसे देण्यासाठी मोबाईल ऑन करतो आणि QR Code स्कॅन करुन पेमेंट करतो. मात्र, हा QR Code काम कसे करतो ते तुम्हाला माहीत आहे का? त्याचा फुलफॉर्म  काय, याची आपल्याला माहिती नसते. चला आपण ती जाणून घेऊ या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाईन पेमेंट करण्यापेक्षा QR Code स्कॅन करुन पेमेंट करणे अधिक सोपे आणि जलद झाले आहे. यासाठी डिजिटल क्रांतीमध्ये इंजिनीअर्सचे खूप मोठे योगदान आहे. त्यांनी अशी काही अ‍ॅप्स तयार केली आहेत, ज्यामुळे डिजिटल पेमेंट करणे खूप सोपे झालेय. क्यूआर कोड स्कॅन करुन तुम्ही हवे तेवढे पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पाठवू शकतात. किंवा तुम्ही प्रत्यक्षात त्या ठिकाणी नसताना मोबाईलवर क्यूआर कोड पाठवून तुम्ही घर बसल्याही पेमेंट करु शकता. या अ‍ॅपच्या माध्यमातून दररोज लाखो लोक पैशाचा व्यवहार करतात. 


पेपरवाला असो की भाजीवाला.. चहावाल्यापासून ते पेट्रोलपंप आणि मोठमोठ्या मॉलमध्ये लोक QR कोडद्वारे पेमेंट केले जाते. पण हा QR कोड नेमका आहे तरी काय आणि तो कसे काम करतो याबाबत तुम्हाला काही माहीती आहे का? नसेल तर जाणून घ्या.


QR कोड म्हणजे काय?


अनेक वेळा लहान मुलांना प्रश्न पडतो. बाबा तुम्ही मोबाईलवरुन कसे पैसे पाठवता? त्यांची ती उत्सुकता असते. मात्र, तुम्हालाही क्यूआर कोडबद्दल माहिती नसेल तर ती जाणून घ्या. क्विक रिस्पॉन्स कोड (Quick Response Code) असा क्यूआर कोडचा  फुलफॉर्म आहे. QR हा मशीन रिडेबल लेबल्ससारखा असतो. जे संगणकाला इतर कोणत्याही मजकुरापेक्षा लवकर आणि सहज समजते. आजकाल सर्व अनेक ठिकाणी QR कोड वापरले जातात. 


प्रामुख्याने प्रॉडक्ट ट्रॅक करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तसेच जाहिराती, बिलबोर्ड आणि बिझनेस विंडोमध्येही या कोडचा वापर केल्याचे पाहायला मिळते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 2D बारकोड हा जगातील सर्वाधिक वापरला जाणारा कोड ठरलाय. कधीकधी याचा वापर प्रॉडक्टचा डेटा स्टोअर करण्यासाठी केला जातो. मात्र, QR कोड डेटा स्टोअर करण्यासाठी एन्कोडिंग मोडचा वापर केला जातो.


QR कोड कसे काम करतो ?


तुम्हाला बारकोड माहीत असेल. प्रश्नपत्रिका किंवा वस्तू घेताना त्या वस्तूवर उभ्या रेषा दिसतात. त्याला बारकोड म्हणतात. बारकोड ज्या प्रकारे काम करतो त्याच प्रकारे QR कोडदेखील काम करतो. परंतु ते दिसायला एकमेकांपेक्षा थोडे वेगळे असतात. QR कोडमध्ये बारकोडसारख्या रेषा नसतात तर यामध्ये अनेक डॉट्स असतात. QR कोड दोन प्रकारचे असतात, पहिला स्टॅटिक QR कोड आणि दुसरा डायनॅमिक QR कोड. स्टॅटिक क्यूआर कोड स्थिर असतो, म्हणजेच एकदा तो जनरेट केला तर तो पुन्हा बदलता येत नाही. तर दुसरा, डायनॅमिक क्यूआर कोड गतिशील असतो. यामधील माहिती अपडेट करता येते.