मुंबई : मुंबईत यूट्यूब फॅन फेस्ट सुरू आहे, या फॅनफेस्टमध्ये यशस्वी झालेले यूट्यूबवर या कार्यक्रमात सहभागी होतात, यावेळी यूट्यूब पाहणाऱ्या, यूट्यूबवर नवीन काही करणाऱ्यांची येथे मांदियाळी असते, या ठिकाणी सर्वात जास्त गर्दी आणि उत्साह असतो, तो युवकांमध्ये. युवकांचा असा उत्साह तुम्हाला कोणत्याही सोशल मीडियावर पाहायला मिळणार नाही, एवढा उत्साह तुम्ही येथे पाहू शकतात, इंटरनेट युगात युवकांना किती नवनवीन गोष्टींचं आकर्षण आहे, किती नवनवीन गोष्टी त्यांना आत्मसात कऱण्याच्या किंवा माहिती मिळवण्याची तहान आहे हे येथे दिसून येते.