मुंबई : यू ट्यूबमध्ये (You Tube) एक नवीन फीचर येत आहे, जे यूझर्ससाठी खूप उपयुक्त ठरेल. या फीचरच्या मदतीने, यूझर्स त्यांचा डेटा सेव्ह करु शकतील. हे फीचर Android आणि iOS यूझर्ससाठी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

You Tube यूझर्स त्यांच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे स्ट्रीमिंग रिजोल्यूशन निवडू शकतात. डेटा सेव्ह करण्यासाठी तो ऑटो मोडचा पर्याय देते. या पर्यायाद्वारे, तो नेटवर्कच्या उपलब्धतेनुसार व्हिडीओ गुणवत्ता देतो. ज्यामुळे तुमच्या इंटरनेटची स्पीड चांगली असेल तर, तो चांगला व्हिडीओ क्वालिटी दाखवतो, किंवा जर इंटरनेट स्पीड कमी असेल तर, व्हिडीओ क्वालिटी खराब दाखवेल.


असे वापरा


यु ट्यूब ओपन करा. अ‍ॅप च्या सेटिंग्ज वर जा. येथे आपल्याला एक नवीन सेक्शन व्हिडीओ क्वालिटी प्रिफरेंस दिसेल. या सेक्शनमध्ये आपल्याला बरेच पर्याय दिसतील. यात आपल्याला हाई पिक्चर क्वालिटी किंवा डेटा सेव्हर सारखा कोणताही पर्याय निवडावा लागेल.


प्रथम पर्याय निवडलात तर मोबाईल डेटाचा जास्त वापर होईल. आणि डेटा सेव्हरचा अर्थ पिक्चर क्वालिटी कमी होणे असेल. हाई पिक्चर क्वालिटी, आपल्याला 720 पिक्सेलचा रिझोल्यूशन मिळेल. डेटा सेव्हरमध्ये आपणास 480 पिक्सेलचा रिझोल्यूशन मिळेल.


जर तुम्हाला कोणता पर्याय निवडावा हे काळत नसेल तर, आपण ऑटो मोड निवडू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही केवळ एक व्हिडीओ पाहण्यासाठी सेटिंग्ज बदलू शकता.