Iphone Fake Or Real Check: अ‍ॅपलच्या आयफोनबाबत मोबाईलप्रेमींमध्ये कायम उत्सुकता असते. आयफोनची किंमत पाहता आयफोनकडे स्टेटस सिम्बॉल म्हणूनही पाहिलं जातं. आयफोन प्रत्येकाला घेणं परवडेल असं होत नाही. पण आपल्याकडे आयफोन असावा अशी इच्छा असते. तोही कमी किंमतीत मिळाला तर सांगायलाच नको. त्यामुळे आयफोन बाळगण्याची इच्छा असणाऱ्यांची ऑनलाईन फसवणूक होऊ शकते. अनेक ठग स्वस्तात फोन देण्याच्या बहाण्याने बनावट फोन हातात टेकवतात. त्यामुळे डोक्यावर हात मारण्याची वेळ येते. आयफोन खरा की खोटा  कसा ओळखायचा? हे जाणून घ्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IMEI नंबर चेक करा


इतर फोनप्रमाणे  आयफोनमध्येही आयएमईआय नंबर असतो. या नंबरद्वारे फोन खरा की खोटा ओळखणं सोपं होतं. आयएमईआय नंबर सर्च करण्यासाठी सेटिंग्समध्ये जा आणि जनरल सेटिंग्स क्लिक करा. अबाउट ऑप्शनवर क्लिक करून खाली जा. जर तिथे आयएमईआय नंबर नसेल तर समजून जा तुमचा फोन डुप्लीकेट आहे. 


ऑपरेटिंग सिस्टम चेक करा


स्मार्टफोन अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतं. पण आयफोन iOS वर काम करतं. आयओएस अँड्रॉईड सिस्टमपेक्षा वेगळा आहे. आयफोनसारख्या दिसणाऱ्या स्मार्टफोन अँड्रॉईड सिस्टम असते. यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन सॉफ्टवेअर टॅप करा. आयओएसमध्ये सफारी, हेल्थ आणि आयमूव्हीसारखे अ‍ॅप्स असतात. जर हे अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये असतील तुमचा फोन योग्य आहे.


फोनची बॉडी


डुप्लीकेट आयफोनची बॉडी हलक्या मटेरियलपासून बनवलेली असते. त्यामुळे हातात घेता क्षणीच डुप्लीकेट असल्याचं कळतं. त्याचबरोबर डिझाईनही महत्त्वाचं आहे. नॉच, फ्रेम आणि कॅमेरा मॉड्यूल बारकाईने बघणं गरजेचं आहे. आयफोन टाइप सी पोर्टसह येत नाही. त्यामुळे चार्जिंग पोर्टदेखील चेक करा. 


फोन डुप्लीकेट असेल तर लगेच अ‍ॅपल स्टोरशी संपर्क करा


अनेक जण नामांकीत वेबसाइटवरून आयफोन खरेदी करता आणि डुप्लीकेट निघतो. आयएमईआय नंबर, ऑपरेटिंग सिस्टम, बॉडीमुळे लगेच लक्षातं येतं. त्यामुळे याची सूचना लगेचच अ‍ॅपल स्टोरला द्या.