वॉशिंग्टन : 'गूगल'चा व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म 'यूट्यूब'कडून धोकादायक किंवा द्वेष पसरवणारे व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचं काम सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये असे तब्बल ९० लाखांहून अधिक व्हिडिओ यूट्यूबवरून हटवण्यात आलेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी सोमवारी ही माहिती दिली. समाजासाठी घातक असे व्हिडिओ पसरवण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. सीएनएनच्या एका प्रश्नाचं उत्तर देताना पिचाई यांनी ही बाब स्पष्ट केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात यूट्यूबच्या वापरकर्त्यांपैंकी जवळपास ८५ टक्के लोक मोबाईलवर व्हिडिओ पाहतात. गेल्या वर्षी हाच आकडे ७३ टक्केवर होता. जानेवारी २०१९ च्या आकड्यांनुसार, देशात यूट्यूबच्या मासिक सक्रीय उपभोक्त्यांची संख्या २६.५ करोडवर गेलीय. गेल्या वर्षी ही संख्या २२.५ करोड होती. यूट्यूबला भारतात प्रवेश करून आता ११ वर्ष उलटलीत. 


२६.५ करोड मासिक सक्रिय उपभोक्त्यांच्या संख्येनिशी आमचा सर्वात मोठा दर्शक वर्ग भारतात आहे, असं 'यूट्यूब'च्या वैश्विक मुख्य कार्यकारी सुझान वोजसिकी यांनी म्हटलं होतं. यूट्यूबच्या वार्षिक कार्यक्रम 'ब्रॉ़डकास्ट इंडिया'ला संबोधित करताना त्या बोलत होत्या. जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या बाजारांपैंकी भारत एक आहे. 


वोजसिकी यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी मोबाईलवर यूट्यूब पाहणाऱ्यांची संख्या वेगानं वाढलीय. १२०० भारतीय यूट्यूब चॅवल असेही आहेत ज्यांच्या सबस्क्रायबर्सची संख्या १० लाखांहून अधिक आहे. हीच संख्या पाच वर्षांपूर्वी केवळ दोनवर होती.