फक्त 13 लाखात बनवली 30 कोटींची Hypersport Super Car; पाहून सगळे हैराण
Lykan Hypersport Car : युट्यूबरनं 13 लाखात बनवली 30 कोटींची Hypersport Super Car
Lykan Hypersport Car : स्पोर्ट्स कारची क्रेझ कोणाला नसते? लहाणांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना स्पोर्ट्स कारची एक वेगळीच क्रेझ असल्याचं पाहायला मिळत. जर तुमच्या लक्षात असेल की लोकप्रिय भारतीय यूट्युबरनं स्वत: 13 लाख रुपये खर्च करत 30 कोटींच्या जवळपास असलेली गाडी बनवली आहे. या कारला तयार करण्यासाठी तन्ना धवलला त्याच्या टीमनं हातभार लावला होता. तन्ना धवल हा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याच्या या कारचे व्हिडीओ शेअर करताना दिसतो.
कोणते फिचर्स आहेत? नक्की या गाडीत असं काय आहे जे तिला इतकी महागडी बनवतात. Lykan Hypersport Super Car ही एक सगळ्यात रेयर आणि हायटेक सुपरकार आहे. या गाडीची स्पेशॅलिटी काय आहे ते आज आपण जाणून घेऊया...
डिझाइन :
कार्बन फाइबर बॉडीसोबत या कारची जबरदस्त अशी डिजाइन आहे.
एक्सक्लूसिव असा या गाडीचा हटके रंग आहे.
होलोग्राफिक डिस्प्ले ज्यामुळे इंटरॅक्टिव मोशन आणि टच सेन्सेशन जाणवतं.
अप्रतिम डिझान आणि ID4Motion डॅशबोर्ड आहे.
युनिक रिव्हर्स मेकॅनिकल डोअर सिस्टम
परफॉर्मेंस :
फ्लॅट 6, ट्विन-टर्बो मिड-रेअर इंजन
770HP आणि 1000NM चं टार्क
6-स्पीड सीक्वेंशियल किंवा 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन
2.8 सेकंदात 0 ते 100 किमी/ता
कमाल स्पीड 395 किमी/ता या सगळ्या सुविधा या गाडीला सुपरकार बनवतात. त्यामुळेच ही सुपरकार एवढ्या कमी रक्कमेत कशी बनवली असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
इतर फीचर्स
लग्झरी आणि आरामदायी अशी ही गाडी आहे. त्यामुळे ही सगळ्यांचं लक्ष वेधताना दिसते. त्याशिवाय यात सुरक्षेसाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. दरम्यान, या गाडीचं प्रोडक्शन काही ठरावीक प्रमाणात करण्यात आलं आहे. त्यामुळे या गाडीला घेऊन सगळ्या प्रेक्षकांमध्ये खूप जास्त उत्सुकता आहे.