Zebronics लॉन्च केले नवे वायरलेस स्पीकर्स...
जेब्रोनिक्स इंडियाने भारतीय बाजारात नवे स्पीकर लॉन्च केले.
मुंबई : जेब्रोनिक्स इंडियाने भारतीय बाजारात नवे स्पीकर लॉन्च केले आहेत. कंपनीने रेट्रो या थीमवर लॉन्च केलेल्या या स्पीकरला एक्सेल नाव दिले आहे. स्पीकरमध्ये मल्टी कनेक्टिव्हीटीचा ऑप्शन दिला आहे. जेब्रोनिक्सने वॉयरलेस स्पीकरमध्ये वॉल्यूम कंट्रोल, मीडिया कंट्रोल आणि इक्यूलाईज ची सुविधा दिली आहे. त्याचबरोबर फोनमध्ये कनेक्ट करुन बोलण्याचाही पर्याय दिला आहे.एलईडी डिस्प्लेसोबत युएसबी आणि मायक्रोएसडी कार्ड स्लॉडही मिळेल. त्याचबरोबर इनबिल्ट रेडिओ आणि ऑक्स कनेक्शन पोर्टही दिले आहे. एक्सेलची डिझाईन खूप दमदार आहे. हे स्पीकर्स कॉम्पॅक्ट आणि हलके असून त्याची साऊंड क्वालिटी उत्तम आहे. यात प्लग इन करण्यासाठी USB/ मायक्रोएसडी कार्डचा उपयोग करु शकता. यात AUX पोर्ट देखील आहे.
कॅरी करण्यास सोपे
लॉन्चिंगच्या दरम्यान जेबरोनिक्सचे दिग्दर्शकांनी सांगितले की. पोर्टेबल स्पीकरची वाढत्या मागणीमुळे आम्ही साऊंड क्वालिटी आणि डिझाईनने समृद्ध अशा नवे पोर्टेबल स्पीकर एक्सेल सादर केले आहेत. हे पोर्टेबलच नाही तर हलके देखील आहेत. तुम्ही अगदी सहज कॅरी करु शकता.
ही आहे किंमत
जेबरोनिक्स एक्सेल बाजारात दोन रंगात उपलब्ध आहेत. रेड आणि ब्लॅक. सर्व रिटेल स्टोर्समध्ये हे स्पीकर्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जेबरोनिक्सच्या या स्पीकरची किंमत 2799 रुपये आहे.