'झीमा' स्कूल ऑफ जर्नालिझमने ९ महिन्याचा सर्टीफिकेट कोर्स, मुंबईत आणि नोएडाला सुरू केला आहे. भारतातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क, झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. या ९ महिन्याच्या कोर्समध्ये ३ महिन्याची इंटर्नशीप देखील असणार आहे. यात प्रत्यक्षात न्यूज रूममधील कामाचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे. या ३ महिन्याच्या काळात विद्यार्थ्यांना मानधन देखील दिलं जाणार आहे. या कोर्सची फी भरण्यासाठी ज्यांना, सुरूवातीला आर्थिक अडचण असेल, त्यांना इस्सेल फायनान्सकडून फायनान्स मिळू शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा ९ महिन्याचा कोर्स हिंदी, इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील असेल. यात लाईव्ह व्हिडीओ शूट, तसेच झी मीडिया आणि इंग्रजी वृत्तपत्र डीएनएचे ज्येष्ठ संपादक आणि निवडक पत्रकारांनी घेतलेल्या महत्वाच्या मुलाखती यांचा देखील समावेश असेल. ९ महिन्याच्या या यशस्वी अभ्यासक्रमानंतर तुम्हाला, झी मीडिया आणि इंग्रजी वृत्तपत्र डीएनए, येथे देखील काम करण्याची संधी मिळू शकते.
 
हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या बाजूने सर्व बाजूंचा विचार करून, वेगवेगळ्या साच्यात बनवण्यात आला आहे, यात विविध भाषेतील पत्रकार, तसेच सध्या सुरू असलेला लेटेस्ट ट्रेन्ड, टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटीलेजन्ट तसेच वास्तविकतेचा विचार करून बनवण्यात आला आहे. पत्रकारितेचा हा कोर्स मीडिया क्षेत्रात नामांकित व्यक्तींकडून शिकवण्यात येणार आहे. तसेच गेस्ट लेक्चरर्स आणि इंटर्नशीपचा देखील यात समावेश असणार आहे. यामुळे मीडिया क्षेत्राला योगदान देणारे, चांगले गुणवान विद्यार्थी मीडिया क्षेत्राला मिळणार आहेत.


नोएडाता या कोर्सला सुरूवात झाली आहे, मुंबईतही 'झीमा'च्या एका बॅचचे प्रवेश सुरू झाले आहेत, मुंबईत देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.


झी मीडिया कॉर्पोरेशनचे मुख्य मानव संसाधन अधिकारी, सुशील जोशी यांनी म्हटले आहे, 'या कोर्समध्ये आम्ही खूप निवडक प्रवेश देणार आहोत, ज्यांच्यात खऱ्या अर्थाने चुणूक दिसत असेल. यामुळे आम्हाला खऱ्या हिऱ्याला पैलू पाडता येणार आहेत. हा कोर्स अभ्यास आणि अनुभवी तज्ज्ञ, तसेच प्रत्यक्षात मीडियात काम करणाऱ्या लोकांकडून बनवण्यात आला आहे. वेगवेगळ्या प्रकारात, आधुनिकता, विविध भाषांमधील झी मीडिया आणि डीएनएच्या पत्रकारांकडून हा कोर्स आखण्यात आला आहे. झी मीडियाला आपले स्व:तचे प्रशिक्षित आणि गुणवान पत्रकार बनवण्याच्या दिशेने हे पाऊल आहे.'


ज्यांना या कोर्ससाठी प्रवेश घेण्याची इच्छा असेल, त्यांनी या ईमेलवर संपर्क साधावा (मुंबई, नोएडा आणि जयपूरसाठी... yogesh.lad@zeemedia.esselgroup.com / diana.chettiar@dnaindia.net


'झीमा' आणि 'झिका' विषयी
'झीमा' आणि 'झीका' या संस्थांच्या माध्यमातून मूळ व्यावसायिक शिक्षण आणि रोजगाराची गरज पूर्ण होणार आहे. झीमा आणि झी इन्स्टीट्यूट ऑफ क्रिएटीव्ह आर्ट (झिका)च्या माध्यमातून बारावी पास, पदवीका किंवा पदवीधरांना ब्रॉडकास्ट, प्रिन्ट आणि डिजिटल पत्रकारिता, तसेच अॅनिमेशन, व्हिज्यूएल इफेक्टस-व्हीएफएक्स, ग्राफिक्स आणि वेब डिझाईनचं शिक्षण दिलं जातं.


भारतातील दर्जेदार शिक्षणाचा दरही वाढत आहे, विद्यार्थी देखील असं कॉलेज शोधतात, ज्यात फक्त शिक्षणाशिवाय,  इतर सर्जनशीलता आणि कल्पकतेला वाव असेल, एवंढच नाही, रोजगाराची देखील शक्यता संस्थेकडून असणे तेवढंच महत्वाचं आहे.


झीमा आणि झिका विद्यार्थ्यांसाठी अशा दोन संस्था आहेत, ज्या तुम्हाला योग्य त्या आशा-अपेक्षांसह, रोजगारांची संधी देण्याचा प्रयत्न करतील. स्पर्धेच्या या युगाचा सामना करण्यासाठी झिका आणि झीमा निश्चित सक्षम करणार आहे. यात न्यूज एडिटिंग, न्यूज रिपोर्टिंग आणि अँकरिंग, न्यूज अॅनेलिसीस आणि डिजिटल मीडियाचा देखील समावेश असेल. या कोर्स मीडियातील सर्व प्रकारच्या बाबी अधोरीखित करणारा आणि विद्यार्थ्यांना सर्व गोष्टीत पारंगत करणारा आहे. 


झिमा ही बारा वर्षापासून चित्रपट, टेलिव्हिजन आणि पत्रकारिता (टीव्ही, प्रिन्ट आणि डिजिटल) या कोर्सचा कालावधी हा ३ ते जास्तच जास्त १२ महिने आहे, सोबत झी मीडिया ग्रुपसोबत इंटर्नशीपची संधी देखील आहे. या सोबत झी मीडिया ग्रुप उत्साहित मुलांना, पत्रकारितेत करिअर बनवण्याचं प्रोत्साहन देण्यासाठी, आर्थिक पाठबळ देखील देणार आहे.


झिका ही भारताची क्लासिकल आणि डिजिटल अॅनिमेशन ट्रेनिंग देणारी अकादमी आहे. यात 2D आणि 3D अॅनिमेशनचा देखील समावेश आहे. मागील २२ वर्षांपासून, झिकाने मागील २२ वर्षात मोठ्या प्रमाणात प्रतिभाशाली विद्यार्थी दिलेले आहेत. येथे विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल दिलं जातं तसेच त्यांना त्याच न्यूज आणि प्रोफेशनल वातावरणात घडवलं जातं. झीकाकडून कला आणि डिझाईनचं तंत्र शिकवलं जातं. यात कम्प्युटर बेस डिजिटल अॅनिमेशन तसेच बेसिक अॅनिमेशनचा समावेश आहे.


झिका - स्कूल ऑफ अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स आणि झिका - स्कूल ऑफ डिझाईन जी जोमात सुरू आहे, आणि यात खूप वेगवेगळ्या कोर्ससचा समावेश आहे. ही संस्था म्हणजे या क्षेत्रात स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचं हब झालं आहे.
 
झी लर्न विषयी
झी लर्न दर्जेदार शिक्षण आणि आगामी शिक्षणाची मागणी पूर्ण करणारं माध्यम आहे. यात तरूणांसाठी व्यावसायिक शिक्षणाचा समावेश आहे. 
तरूणांसाठी व्यावसायिक शिक्षण
झी इन्स्टीट्यूट ऑफ आर्टस (झिका)
झी इन्स्टीट्यूट ऑफ मीडिया आर्टस (झीमा)


उद्देश
झी लर्नचा एक सरळ उद्देश आहे, शिक्षणाचा विकास करणे आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे. आम्हाला विश्वास आहे, प्रत्येकामध्ये काही ना काही विशेष गुण आहेत, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, आमच्या शाळा नेहमीच संधी देत असतात. यात लहान मुलं आणि तरूणांचा देखील समावेश आहे, यात नवकल्पना, आणि व्यावसायिक शिक्षणाचा समावेश आहे.