मुंबई : तंत्रज्ञानामुळे सर्वच कसं बदलत चाललं आहे, आणि यात ज्या कंपन्यांनी लोकांना सोयीसुविधा दिल्या आहेत, त्या कंपन्यांकडून आता जुन्या गोष्टींची 'उपहासात्मक' टोमण्यांनी आठवण करून दिली जात आहे. फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने एक संकेत दिला, आणि सांगितलं लवकरच आम्ही घरी बनवलेलं जेवण देखील डिलीवर करू. यानंतर अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट केलं, 'Guys, कभी-कभी घर का खाना भी खा लेना चाहिए.' हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढंच नाही जगभरातील प्रसिद्ध आणि मोठ्या कंपन्यांनी देखील अशाच प्रकारचे ट्वीट करण्यास सुरूवात केली. या कंपन्यांनी आपला रोख झोमॅटोसारखाच ठेवत, ट्वीट केलं जे पुन्हा व्हायरल झालं.

YouTube India ने ट्वीट केलं, 'कधी कधी रात्री ३ नंतर फोन बाजूला ठेवून झोपलं पाहिजे'


अमेझॉन प्राईम व्हिडीओने लिहलं, 'guys, कधी कधी केबलवरही काहीतरी पाहिलं पाहिजे'


मोबिक्विकने ट्वीट केलं, 'कधी कधी रांगेत उभं राहून वीजेचं बिल भरलं पाहिजे.'


TVF ने ट्वीट केलं, 'कधी-कधी घरी देखील टीव्ही पाहिला पाहिजे.'


झोमॅटोच्या ट्वीटनंतर हा ट्रेन्ड सुरू झाला, झोमॅटो लवकरच घरी बनवलेलं जेवण ऑफिसपर्यंत पोहचवणं सुरू करणार आहे. तसेच ज्या लोकांना घरचं बनवलेलं जेवण खायचं आहे, त्यांना घरी बनवलेलं जेवणं उपलब्ध करून दिलं जाणार आहे. 


तसेच घरी बनवलेलं जेवण हे ग्राहकांच्या वयानुसार बनवलं जाणार आहे. विद्यार्थी आणि नोकरदारांना त्यांच्या पसंतीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे डबे बनवून दिले जाणार आहेत.