नवी दिल्ली: महानायक अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' हा रियालिटी शो सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणार असल्याने सोनी ने 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' ही लोकप्रिय मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेचा शेवटचा एपिसोड २५ ऑगस्टला प्रदर्शित करण्यात येईल. 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' ऐवजी 'बेहद' ही मालिका बंद होणार होती. परंतु, तो निर्णय रद्द करून 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' ही मालिका बंद करण्याचा निर्णय सोनी टीव्हीने घेतला आहे. 
ही मालिका प्रचंड लोकप्रिय असल्याने अनेक प्रेक्षक या निर्णयाला विरोध करत आहेत. आशी कुमार नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवर पिटीशन तयार केले असून यावर दोन दिवसात पाच हजार लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या सगळ्यांचा ही मालिका बंद करण्याच्या निर्णयाला विरोध आहे. ही मालिका पुढे बघण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. 
याबद्दल मालिकेचे निर्माते यश पटनायक यांनी सांगितले की, 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या महिलेचे चाहते ऑनलाईन अधिक आहेत. परंतु, या मालिकेच्या दिग्दर्शकांनी ही मालिका टीव्हीवर सुरु ठेवावी. प्रेक्षक ही मालिका १८ महिन्यांपासून बघत आहेत. पण आता याचा टीआरपी घसरत आहे. घसरणारा टीआरपी लक्षात घेता वाहिनीने मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.