Central Railway: बदलापुरात प्रवाशांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या 30 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच लांबपलल्याच्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत. बदलापुरात शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याविरोधात हजारो नागरिक रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून हे आंदोलन सुरु असल्याने अंबरनाथच्या पुढे एकही लोकल जाऊ शकलेली नाही. रेल रोकोचा मोठा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते अंबरनाथ पर्यंत अप आणि डाऊन मार्गावर विशेष लोकल सोडल्या जात आहेत. लोकल ट्रेन प्रमाणेच लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेनची वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. अनेक रेल्वे ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. 


बदलापूर आंदोलनामुळे 30 मेल एक्सप्रेस आणि 30 लोकल सेवा वळवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सुमारे 12 मेल एक्सप्रेस गाड्या वळवण्यात आल्या आहेत. कोयना एक्सप्रेसचा मार्ग वळवण्यात आला असून बदलापुरहून कल्याणला आणण्यात येत आहे. बदलापूरनंतर दिवा आणि पनवेल मार्गे कर्जतकडे मार्गस्थ करण्यात आल्या आहेत. 



आतापर्यंत अंबरनाथ ते कर्जत खोपोली दरम्यान सुमारे 30 लोकल गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवासी घरी जात असल्याने ही संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. सीएसएमटी ते अंबरनाथ आणि कसाराकडे जाणाऱ्या सेवा सुरळीत सुरू आहेत. 



कल्याण ते कर्जतदरम्यानच्या प्रवाशांसाठी अतिरिक्त बस सोडण्याची विनंती करण्यात आली आहे. 100 बसेसची तरतूद करण्यासाठी राज्य परिवहनांकडून मदतीची विनंती केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आतापर्यंत सुमारे 55 बसेस सेवेंत आल्या आहेत.


कोणत्या एक्स्प्रेस रद्द?


अनेक रेल्वे या कजर्त पनवेल मार्गे वळवण्यात आल्या आहेत.  Pune - NZM DURANTO EXP, CSMT - MAS Express JCO, CSMT - Solapur Vande Bharat Exp, YB-CSMT MUMBAI EXP,  SUR - CSMT VandeBharat , CBE - LTT Exp, YPR-BME AC EXP यासह अनेक एक्सप्रेस ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला आहे. याचा मोठा फटका रोज मुंबई पुणे असं अप डाऊन करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. अनेक पुणेकर हे मुंईत अडकले आहेत. तर काही एक्सप्रेस दिवा पनवेल मार्गे वळवण्यात आल्या आहेत.