मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप सरकार सत्तेत आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40  शिवसेना आमदारांनी वेगळी भूमिका घेत महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले होते. हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. परंतू शिवसेना उद्धव ठाकरे गटातील गळती सुरूच असून आज ठाणे महानगर पालिकेतील शिवसेनेचे 66 नगरसेवक  शिंदे गटात सहभागी झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात महाविकास आघाडीला सुरूंग लावत शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. शिवसेनेतून 40 आमदारांनी बंड केल्यामुळे पुन्हा शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीचे सरकार अस्थित्वात आले आहे. त्यामुळे हा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी घडामोड आहे. 


आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्ष सावरण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे सरसावले असून, दररोज जिल्ह्याजिल्ह्यातील स्थानिक नेत्यांच्या ते बैठका घेत आहेत. परंतू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरातील 66 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. या नगरसेवकांमध्ये ठाण्याचे महापौर नरेश मस्के यांचाही सामावेश आहे. 


ठाण्यातील नगरसेवकांच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंना आणखी धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता शिवसेनेचे खासदार देखील एकनाथ शिंदे गटाला समिल होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.